विभागात मेंदूज्वराने दिली दस्तक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

नागपूर : सार्वजनिक आरोग्याच्या पूर्व विभागात क्‍युलेक्‍स डासांमुळे होणाऱ्या जपानी मेंदूज्वराची लक्षणे असलेल्या 15 रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र हे रुग्ण जपानी मेंदूज्वराचे आहेत की चंडीपुरा मेंदुज्वराचे आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नसल्यामुळे आरोग्य विभागाची ही आकडेवारी गोंधळात घालणारी आहे. प्रयोगशाळेकडून आलेल्या अहवालानंतरच हे स्पष्ट होईल, असे चित्र आरोग्य विभागात आहे. विशेष असे की, संशयित रुग्णांची संख्या 71 असल्यामुळे पुरता आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.

महिनाभरापूर्वी बिहारमध्ये "चमकी' तापाचा हैदोस पसरला होता. दोनशेवर चिमुकल्या मुलांना या तापाने विळख्यात घेतले होते. यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभागानेही हयगय न करता थेट उपचाराचा सल्ला दिला आहे. मागील पाच महिन्यांत आरोग्य विभागात जपानी मेंदूज्वराचे 15 रुग्ण आढळले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गतवर्षी डेंगीचा प्रकोप होता. यावर्षी मेंदूज्वराने डोके वर काढल्यास आरोग्य विभागाची भंबेरी उडण्याची शक्‍यता आहे.
तिघांचा मृत्यू
जपानी मेंदूज्वराने नागपूर विभागात तिघांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दोन तर गोंदिया जिल्ह्यातील एकाचा या मृतांमध्ये समावेश आहे. जपानी मेंदूज्वराचा कहर सद्या गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपुरात दिसून येत असला तरी उपचारासाठी मेडिकलमध्ये आणले जाते. यामुळे नागपुरात मेंदूज्वराचा धोका आहे, असे आरोग्य विभागाचे अधिकारी खासगीत चर्चेत बोलताता दिसतात. गडचिरोलीत 6, वर्ध्यात 5 आणि चंद्रपूरमध्ये 3 रुग्ण आढळले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knockout by brain fever in section