आई- वडील नाही मुलांचे बना मित्र! जाणून घ्या पाल्यांसोबत बॉण्डिंग वाढवण्याच्या काही टिप्स 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

तुम्ही मुलांच्या जीवणामध्ये एक चांगला मार्गदर्शक बनायला हवे मुलांना नुसत्या अमुक अमुक करू नका म्हणून नुसत्या सूचना केल्या तर राग तर येतोच शिवाय त्यांना मुद्दाम होऊन ती गोष्ट करावीशी वाटते.

नागपूर : मुलं म्हणजे आई वडिलांच्या जगण्याचा महत्वाचा हेतू असतात. म्हणूनच आई - वडील होण्यासारखे दुसरे भाग्य नाही असे म्हणतात. मुलांना लहानाचं मोठं करण्यात आई-वडील संपूर्ण आयुष्य खर्च करतात. मुलं जशी जशी मोठी होत जातात तशी त्यांना समज येण्यास सुरुवात होते.  मात्र यानंतर आई-वडिलांचं खार काम सुरु होत. ते म्हणजे आपल्या पाल्याला सांभाळून घेणे आणि समजून घेणे. यामुळेच पालकांमध्ये आणि मुलांमध्ये बॉण्डिंग वाढते, आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमची तुमच्या पाल्यांसोबत बॉण्डिंग घट्ट होईल. 

अधिक माहितीसाठी - पोटाची खळगी भरण्यासाठी भवानी मंदिराची रंगरंगोटी करायला गेला, पण काळाने घातला घाला 

मग जर आई-बाबा नको म्हणत असतील तर ते या गोष्टी आई बाबांपासून लपून करतात यामुळे पालक आणि मुलांमधील अंतर वाढतच जातं उदाहरण द्यायचं झालं तर मुलांना कसं वाईट असतं आणि त्यांना ते न देऊन आपण मात्र त्यांच्यासमोर मोठ्यांना चालतं असं म्हणून पीत बसायचं असं करू नका.

मुलांसाठी आई-बाबा हे पहिले गुरू असतात ते आई-बाबांकडे बघूनच लहानाचे मोठे होत असतात आई-बाबांचा अनुकरण करत असतात कित्येकदा लहान मुलांना मोठं होऊन कोणासारखं व्हायचं असा प्रश्न विचारला तर त्यांचे उत्तर आईसारखं किंवा बाबांसारखा व्हावेसे वाटते असेच वाटत असणार. 

त्यामुळे आपल्याला जे मुलांनी करायला हवा आहे तेच जर आपण केलं तर मुलं आपोआप शिकतील. आपण वेळोवेळी मुलांच्या या सवयी बरोबर मुलांचे लाड देखील पुरवले पाहिजेत.बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की मुलांचे खूप लाड केले तर मुले बिघडतात.

क्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

पण लाड करणे आणि लाडावून ठेवणे यात भरपूर फरक आहे मुलांच्या चुकांवर पांघरूण घालने त्यांना काय चूक काय बरोबर याची जाणीव करून देणे त्यांचे सगळे हट्ट पुरवणे म्हणजे मुलांना लावणे आणि या उलट मुलांना जवळ घेऊन त्यांना आपल्या त्यांच्यावरच्या प्रेमाची जाणीव करून देणे त्यांनी एखादी चांगली गोष्ट केली तर त्याबद्दल त्यांचं कौतुक करून त्यांना बक्षीस देणे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know the tips to create strong bonding with your children

Tags
टॉपिकस
Topic Tags: