controversy over the relocation of Mahadevi elephant from Kolhapur to Vantara : कोल्हापुर जिल्ह्यातील नांदणी मठातल्या महादेवी या हत्तीणीला गुजरातच्या वनतारा प्रकल्पात पाठविण्यात आले आहे. हे प्रकरण सध्या राज्यभर गाजत असताना गडचिरोली जिल्ह्यातील तीन हत्तींना मध्यरात्री गुपचुप नेल्याच्या घटनेची जखम ताजी झाली आहे. जिल्ह्यात कमलापूर हत्ती कॅंम्प येथे ९ हत्ती असून महादेवीनंतर आता कमलापुरच्या हत्तींचा तर नंबर लागणार नाही ना, अशा शंकेची पाल जिल्हावासींच्या मनात चुकचुकत आहे.