Election Results 2019 : पूर्व नागपूर मतदारसंघ : कृष्णा खोपडे 23 हजार 924 मतांनी विजयी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

बसप व वंचित आघाडीचे उमेदवारही कॉंग्रेसच्या मतात वाटेकरी होणार आहेत. याचा फटका कॉंग्रेसला बसल्याचे सांगितले जाते. भाजपला विजयाची सर्वाधिक खात्री असलेल्या मतदारसंघामध्ये पूर्व नागपूरचा समावेश होता. 

नागपूर : पूर्व नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार आमदार कृष्णा खोपडे तब्बल 23 हजार 924 मतांनी विजयी झाले. कॉंग्रेसचे उमेदवार नगरसेवक पुरुषोत्तम हजारे आणि भाजपचे कृष्णा खोपडे यांच्यात थेट लढत होती. हजारे यांना 79 हजार 829 मतांवर समाधान मानावे लागले. अंतर्गत संघर्षाचा फटका कॉंग्रेसला बसला असून, त्याचाच फायदा भाजपला झाला. खोपडे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. 
भाजपची कमान दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नितीन गडकरी यांना लोकसभेत सर्वाधिक मताधिक्‍य याच मतदारसंघाने दिले आहे. दहा वर्षांच्या कार्यकाळात आमदार कृष्णा खोपडे तळागाळापर्यंत पोहोचले. सहज उपलब्ध होणारा आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. विकासकामे करण्याची त्यांची आपली स्वतंत्र शैली आहे. स्मार्ट सिटीच्या कामांना त्यांच्याच मतदारसंघातून सुरुवात झाली आहे. झोपडपट्टीधारकांना याचा फटका बसत असला, तरी उच्च व मध्यमवर्गीय विकासामुळे खूश आहेत. दुसरीकडे त्यांच्या तुलनते कॉंग्रेसने फारच नवख्या उमेदवाराला रिंगणात आणले आहे. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व त्यांच्या कार्यकर्त्यांचे पाठबळ वगळता कॉंग्रेसचे कार्यकर्ते मनापासून काम करताना दिसले नाहीत. बसप व वंचित आघाडीचे उमेदवारही कॉंग्रेसच्या मतात वाटेकरी होणार आहेत. याचा फटका कॉंग्रेसला बसल्याचे सांगितले जाते. भाजपला विजयाची सर्वाधिक खात्री असलेल्या मतदारसंघामध्ये पूर्व नागपूरचा समावेश होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krishna khopade won by 23 thousand 924 votes