मराठीपुत्राने जिंकली सातासमुद्रापारची लढाई - ऍड. हरीश साळवे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

नागपूर - 'अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही,' असा निकाल देत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला मोठा धक्का दिला. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयासाठी भारतातर्फे बाजू मांडणाऱ्या नागपूरपुत्र ऍड. हरीश साळवे यांचा प्रभावी युक्तिवाद सर्वाधिक उपयुक्त ठरला. उपराजधानीत पाळेमुळे असलेल्या ऍड. साळवेंच्या कौशल्यपूर्ण युक्तिवाद आणि जोरकस वक्‍तृत्व शैलीमुळे भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

नागपूर - 'अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही,' असा निकाल देत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला मोठा धक्का दिला. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयासाठी भारतातर्फे बाजू मांडणाऱ्या नागपूरपुत्र ऍड. हरीश साळवे यांचा प्रभावी युक्तिवाद सर्वाधिक उपयुक्त ठरला. उपराजधानीत पाळेमुळे असलेल्या ऍड. साळवेंच्या कौशल्यपूर्ण युक्तिवाद आणि जोरकस वक्‍तृत्व शैलीमुळे भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर संपूर्ण देशातून याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. त्यामुळेच पाकिस्तानच्या त्या निर्णयानंतर भारताने आपल्या पुत्रासाठी थेट आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मागितली. कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्यासाठी भारताकडून बॅरिस्टर हरीश साळवे यांची निवड करण्यात आली. हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात अतिशय समर्पक शब्दात पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड केला. याचवेळी पाकने व्हिएन्ना कराराचा भंग केल्याचेही त्यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टाला पटवून दिले. या संपूर्ण युक्तिवादाचा आज परिणाम पाहायला मिळाला. हरीश साळवेंच्या याच युक्तिवादानंतर अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही, असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे.

संगीतप्रेमी साळवे
कायद्याच्या धीरगंभीर वातावरणात असलेल्या हरीश साळवे यांची वेगळी बाजूही आहे. साळवे हे संगीतप्रेमी असून, त्यांना चक्क पियानो वाजविण्याचा छंद आहे. इतकेच नाही, तर संगीत याच विषयात एके दिवशी आपण ऑक्‍सफर्ड विद्यापीठातही तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करण्याचा विश्‍वास त्यांना आहे.

प्रभावशाली व्यक्तींपैकी एक
आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कमपणे मांडणारे हरीश साळवे देशातल्या सर्वांत प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांमध्ये 43 वे नाव आहे. हरीश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड येथील असला तरी त्यांचा बराचसा काळ नागपुरात गेला. यांना वकिलीचे बाळकडू घरातूनच मिळाले. साळवे यांचे आजोबा पी. के. साळवे हे प्रख्यात फौजदारी वकील होते. तर त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. साळवे यांचे वडील एन. के. पी. साळवे हे कॉंग्रेसचे दिग्गज नेते होते. हरीश साळवे हे वकिली करण्याआधी सीए झाले. पण, प्रख्यात वकील नानी पालखीवाला यांच्यामुळे प्रभावित झालेल्या साळवे यांनी वकिलीची पदवी मिळवली.

साळवेंची आजवरची कारकीर्द

  • 1980 : जे. बी. दादाचंदजी आणि कंपनी यांच्याकडे साळवे यांनी इंटर्नशिप केली.
  • 1980 ते 1986 : ऍटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबत काम केले.
  • हरीश साळवे यांनी सर्वांत आधी सर्वोच्च न्यायालयात अँटी डम्पिंग केस लढली.
  • टाटा ग्रुपच्या अनेक खटल्यांची जबाबदारीही साळवे यांनी पेलली आहे.
  • बिल्किस बानोची केसही साळवे यांनीच लढली होती.
  • सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणात साळवेंनी सलमानची बाजू मांडली.
Web Title: kulbhushan jadhav hanging stop