विषाणू प्रयोगशाळा लवकरच नागपुरात

File photo
File photo

नागपूर : विदर्भातील संसर्गजन्य आजाराचे निदान पुण्यावर अवलंबून आहे, ही बाब उपराजधानीसाठी भूषणावह नाही. मात्र, आता एक खुशखबर! नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) लवकरच राज्यस्तरीय विषाणू प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च ऍण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
मध्य भारतात गौरवशाली इतिहास असलेले "मेडिकल' आहे. "सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल' आहे. कार्गो हब, मिहानमुळे नागपूर जगाच्या नकाशावर आले; परंतु आरोग्यसेवा व्यवस्थेचा क्षेत्रीय अनुशेष मात्र कायम आहे. हाफकिन्ससारखी लस संसोधन संस्था विदर्भात नाही. यामुळेच राज्यस्तरीय विषाणू प्रयोगशाळा तयार करण्याच्या निर्णयाला बुधवारी मंत्रिमडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रशासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाअंतर्गत 12 व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत साथीचे आजार आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी प्रयोगशाळेचे जाळे निर्माण करण्याची योजना सरकारची असल्याचे सांगण्यात आले. त्याअनुषंगाने सामंजस्य करार करण्यात येईल. नागपूरच्या राज्यस्तरीय प्रयोगशाळेसह औरंगाबाद, अकोला, धुळे आणि सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासह पायाभुत सुविधांची निर्मिती
स्वाइन फ्लू असो की चंडीपुरा... या संसर्गजन्य आजाराच्या रक्ताचे नमुने उपराजधानीत तपासण्याची सोयच नव्हती. रक्तजल, रक्त असो की जिभेवरील द्रवाचे नमुने, पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. पूर्व विदर्भात दरवर्षी "स्क्रब टायफस' असो की, "चंडीपुरा' या साथीच्या मेंदूज्वराने अनेक बालके दगावतात. 2009 पासून चंडिपूराचे रुग्ण आढळतात. चंडीपुरानंतर बर्ड फ्लूने अनेकांची जीवहानी झाली होती. यानंतर चिकन गुन्या,स्वाइन फ्लू विदर्भात दाखल झाला होता. आत नागपुरात विषाणु उपकेंद्र होत असल्याने साथ पसरविणाऱ्या विषाणूंचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, आजार निदान संच तयार करण्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच विषाणूंबाबत संशोधन आणि अभ्यास करणे हा या प्रयोगशाळेचे उद्देश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com