esakal | आंघोळीचा मोह बेतला जीवावर, तरुणाचा कुंडात बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

A laborer from Rajasthan Death by drowning in Johar Kunda

जेवणानंतर पाण्याच्या कुंडाजवळ फिरत असताना राजाराम जाट याने सहकाऱ्यांकडे पोहण्याचा आग्रह धरला. बऱ्यापैकी पोहता येत असल्याने त्याने कुंडात उडी घेतली.

आंघोळीचा मोह बेतला जीवावर, तरुणाचा कुंडात बुडून मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिखलदरा (जि. अमरावती) : सेमाडोहपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जोहार कुंडाजवळ गाडी थांबून राजस्थानातील मजुरांनी जेवण केले. त्यांच्यापैकी एका युवकाने आंघोळ करण्यासाठी जोहार कुंडात उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा कुंडात बुडून मृत्यू झाला.

मागील वर्षी मुबलक पाऊस झाल्याने तवाल, नद्या, धरणे, कुंड यांमध्ये मुबलक जलसाठा आहे. त्यातच अधूमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने यंदा पाण्याची स्थिती उत्तम आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस पडत असल्याने जलसाठ्यांमध्ये वाढ झालेली आहे.

'ते' दोघे पती-पत्नी दुचाकीवर जात होते घराकडे, रस्त्यातच कशा तुटल्या जन्माच्या गाठी...

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी अद्याप उद्योगधंदे सुरू न झाल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. रोजगाराचा प्रश्‍न असल्याने काही मजूर आपल्या राज्याकडे निघाले. राजस्थानकडे जात असताना सेमाडोहजवळील जोहार कुंडाजवळ गाडी थांबवून सर्व मजुरांनी जेवण केले.

जेवणानंतर पाण्याच्या कुंडाजवळ फिरत असताना राजाराम जाट याने सहकाऱ्यांकडे पोहण्याचा आग्रह धरला. बऱ्यापैकी पोहता येत असल्याने त्याने कुंडात उडी घेतली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात गायब झाला. सहकाऱ्यांपैकी कुणालाही पोहाता येत नसल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केला. परंतु एरवी पर्यटकांनी गजबजलेल्या या परिसरात संचारबंदी आणि कोरोनामुळे कुणीही नव्हते. त्यामुळे मदतीसाठी कुणीही आले नाही.


सहकाऱ्यांनी शोध घेतला, परंतु त्याचा शोध लागला नाही. पोलिसांनी शोधमोहीम राबून त्या युवकाचा मृतदेह मंगळवारी (ता. दोन) बाहेर काढला. या युवकासोबत नागोर जिल्हा राजस्थान येथील विष्णूकुमार जाट, खुशाल जाट, धनाराम जाट, प्रकाश जाट व एक महिला होती. पुढील तपास चिखलदरा पोलिस करीत आहेत.