जीएमसीनंतर आता लेडी हार्डींगचाही पाणीपुरवठा खंडित

save water
save water

अकोला : पाणीपट्टीचे एक कोटी नऊ लाख 85 हजार रुपयांच्या देयके थकीत ठेवणाऱ्या जिल्हा स्त्री रुग्णालयाचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. खंडित झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असून, रुग्णालय प्रशासनाची चिंता वाढली आहे. 


महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने जिल्हा स्त्री रुग्णालयाचा पाणी पुरवठा बंद केल्याने येथील प्रसुतीची सेवा प्रभावित झाली आहे. गत वर्षभरापासून येथे सिजरीयनचे प्रमाण वाढल्याने परिस्थिती गंभीर होत असून, रुग्णालय प्रशासनाची चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी याच प्रकारे जीएमसीतील पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे गत दोन वर्षापासून पाणी पट्टीचे एक कोटी नऊ लाख 85 हजार रुपयांचे देयक थकीत आहेत. देयक न भरल्याने महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने पाच दिवसांपूर्वीच येथील पाणी पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे येथील पाण्याची गरज सहा बोअरच्या साहायाने भागविण्यात आली. मात्र, यातील एक बोअर जळाल्याने येथील पाण्याचे संकट वाढले आहे. मध्यंतरी मार्च 2019 मध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाने महापालिकेला 20 लाखांचे देयक अदा केले होते. दोन वर्षांच्या थकीत पाणी पट्टी देताना महापालिकेच्या जलप्रदाय विभागातर्फे 1 कोटी 9 लाख 85 हजार रुपयांचे देयक जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले. परंतु, रिडींग न घेताच हे देयक देण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. मीटर रिडींगवरुन जिल्हा स्त्री रुग्णालयाने प्रश्न उपस्थित केला. 

जीएमसी प्रशासन म्हणते रुग्ण नका पाठवू
सर्वोपचार रुग्णालयातील प्रसूती शास्त्र व स्त्री रोग विभाग नव्या इमारतीत हलविणे सुरू आहे. अशातच जिल्हा स्त्री रुग्णालयात पाण्याची समस्या निर्माण झाल्याने येथील गर्भवतींना प्रसुतीसाठी सर्वोपचार रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, वार्ड हलविण्याचे काम सुरू असल्याने जीएमसी प्रशासनाने गर्भवतींना स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

लवकरच हा प्रश्न मार्गी काढू. 
थकीत देयकामुळे महापालिकेने पाणी पुरवठा खंडित केला आहे. सहा बोअरच्या सहाय्याने पाण्याची गरज भागविण्यात येत असली, तरी उन्हाळा पाहता पाण्याची आवश्यकता जास्त आहे. महापालिका प्रशासनासोबत बोलणे सुरू असून,  लवकरच हा प्रश्न मार्गी काढू. 
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षीका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com