स्वच्छतेवर लाखोंचा खर्च; प्रत्यक्ष काम कागदावरच

स्वच्छतेवर लाखोंचा खर्च; प्रत्यक्ष काम कागदावरच

अकोला : शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत गटार योजना मंजूर आहे. अमृत योजनेतून या योजनेचे काम होणार असले तरी सध्या अस्तित्वात असलेली गटार स्वच्छ करण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संपूर्ण देश २ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता पंधरवडा साजरा करीत आहे. यानिमित्ताने अकोला शहरातही महापालिकेतर्फे स्वच्छतेवर विशेष भर देणारे कार्यक्रम आयोजित केले जात आहे.

बैठकांवर बैठका आयोजित केल्या जात असताना अकोला शहरात मात्र प्रत्यक्षात असलेली स्थिती अतिशय चिंताजनक आहे. काही बोटावर मोजण्याइतके परिसर सोडले तर रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी आणि तुंबलेले गटार आणि कचऱ्याने भरलेल्या सर्व्हिस लाईन व रस्त्याच्या कडेला पडून असलेले कचऱ्याचे ढिग दिसून येतात. त्यामुळे अकोला शहरात स्वच्छतेवर दररोज होणारा लाखोंचा खर्च केवळ कागदोपत्री तर सुरू नाही ना, अशी साशंकता उपस्थित होऊ लागली आहे.

नियमित कचरा उचलला जात नाही

शहरातील मुख्य बाजारपेठेतील कचरा नियमित उचलण्यात येत नाही. त्यामुळे बाजारपेठेतील रस्त्यावर कचऱ्याचे ढिग दिसून येतात. याबाबत 'सकाळ'ने काही परिसराची पाहणी केली असता गटार तुंबल्यामुळे रस्त्यावरून वाहणारे पाणी दिसून आले तर काही ठिकाणी गल्लीत कचरा साचलेला आणि त्यात डुकरांचा मुक्त संचार आढळून आला.

कुठे काय आढळले?

1) मुख्य बाजारपेठ परिसराला लागून असलेल्या सावतराम मिलच्या मागिल परिसरातील रस्त्याच्या कडेला कचरा पडून आहे. 
2) टिळक रोडवर काका मिठाईवाला यांच्या प्रतिष्ठानापुढील रस्त्यावर गटारातील पाणी येत असल्याने झालेला चिखल.
3) सराफा बाजाराजवळ के.के. मेवावाला प्रतिष्ठानच्या बाजूला असलेल्या गल्लीत साचलेला कचरा.

उचला मोबाईल, पाठवा फोटो!

शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढिग आहेत. काही ठिकाणी मुख्य रस्त्यावरच तुंबलेल्या गटामुळे चिखल झाला आहे. कचऱ्याने माखलेले रस्ते आहेत आणि नियमित स्वच्छता होत नाही. तेव्हा मोबाईल उचला, फोटो काढ आणि पाठवून द्या 'सकाळ'कडे sakal.akola@gmail.com या ई-मेल आयडीवर. तुमची समस्या 'सकाळ'च्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचविली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com