कऱ्हांडल्याचा लंकेश घोरपडींचा जीवनदाता 

वेलतूर ः घोरपडींना जीवनदान देणारा लंकेश चुधरी
वेलतूर ः घोरपडींना जीवनदान देणारा लंकेश चुधरी

वेलतूर   (जि.नागपूर):  उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य परिसरातील तरुणांनी वाघ्र संवर्धनासह घोरपड संवर्धनातही आपले नाव कोरून जैवविविधता जपण्याचा नवा अध्याय लिहिला आहे. त्यांचे सर्वच कौतुक होत असून लंकेश चुधरी या युवकाने स्वयंप्रेरणेने गोसेखुर्द धरणातील बॅक वाटरने प्राणी-पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यानंतर सैरभैर झालेल्या या पशुपक्ष्यांना त्यांचे अधिवास पुन्हा मिळवून देण्यासाठी शिव गेडेकरसारख्या सर्पमित्रांसवे प्रयत्न केले. या प्रयत्नांमुळे "घोरपडमित्र लंकेश' म्हणून त्याला नवी ओळख मिळाली आहे.        
        बिळात पाणी शिरल्यावर बाहेर पडलेल्या शेकडो घोरपडींना शिकाऱ्याच्या तावडीतून वाचवून त्या जंगलात वनाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सोडण्याचे काम लंकेशने करून सर्वांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे. गावात व परिसरात कुठेही घोरपड दिसल्यावर सर्पमित्रागत त्याला फोन येत असून तो त्यांना शिताफीने पकडून त्यांच्या अधिवासात सोडण्याचे अभिनंदनीय काम करतो. लंकेश बीएस्सी द्वितीय वर्षात शिकत आहे.  घोरपड आशीयात सर्वत्र आढळणारा सरड्याचा एक विशाल प्रकार आहे. पाल, सरडा, घोयरा यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांशी घोरपडीचे जवळचे नाते आहे. घोरपडीला इंग्रजीत "माऑनिटर लिझार्ड' असे म्हणतात. व्हॅरॅनस बेगालेन्सिस-बेगालं माऑनिटर ही घोरपड भारतात सर्वत्र आढळून येथे. मात्र, अलीकडे ती संकटग्रस्त प्रजातीमध्ये गणल्या जाते. तिची मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी व औषधीसाठी शिकार केली जात आहे. तिला वाचविण्याचे लंकेशचे प्रयत्न आजघडीला तरी कौतुकास पात्र आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com