भूसंपादन, पुर्नवसनाचे पैसे दोन महिन्यात

भूसंपादन, पुर्नवसनाचे  पैसे दोन महिन्यात
नागपूर : मिहान प्रकल्पातील खापरी गावठाण येथील नागरिकांचे भूसंपादन आणि पुर्नवसन करण्यात दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यासाठी आवश्‍यक तो निधी लवकरच उपलब्ध होईल, असे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज खापरी येथे प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत दिली.
बैठकीला उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, अविनाश कातडे, एमएडीसीचे चहांदे व शेकडो गावकरी उपस्थित होते. गावठाणाच्या पुनर्वसनाला शासनाने मंजुरी दिली आहे. पैसा आणि वर्धा रोडच्या पूर्वीकडे पुनर्वसन होणार आहे. या संदर्भाततील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सर्वे नं 227 आणि 228 मधील 3.22 हेक्‍टर जमीन भूसंपादन करायची आहे. जोपर्यंत मिहानकडून भूसंपादनाचा निधी येणार नाही, तोपर्यंत कलम 19/3 ची कारवाई करता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मिहानकडे निधी तयार आहे. तो जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केल्यानंतर लगेच भूसंपादनाची कारवाई होऊन पैसे वाटप केले जातील. या कारवाईसाठी 2 महिन्यांचा अवधी लागणार आहे. झोपडपट्टीचाही पुनवर्सनात समावेश केला जाणार आहे. भूखंड वाटपासाठीची यादी तयार आहे. या यादीवर 124 आक्षेप आले असून भूसंपादन कार्यालयाकडे ते पाठविण्यात आले. आक्षेप निकाली निघाले की आठवडाभरात प्लॉट वाटपही करण्यात येणार आहे. शेतकऱ्याला 3000 चौ. फूट, शेतकरी नसेल त्याला 1500 चौ. फूट आणि अतिक्रमणधारक असेल तर त्याला 1000 चौ. फूट प्लॉट दिला जाईल. बांधलेले घर पुनवर्सनाच्या जागेवर स्थलांतरित करण्यात येईल. त्यासाठी ट्रक आणि 10 हजार रुपये मिहानकडून देण्यात येतील.
भूमापनच्या चुका सुधारा
गावठाणाची हद्द ठरवताना नगर भूमापन विभागाने काही चुका केल्या आहेत, त्या सुधारणे आवश्‍यक आहे. यासाठी पुन्हा मोजणी करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली. ज्या प्रकल्पग्रस्तांना भूखंड मिळाले, पैसे मिळाले, त्यांची जागा मिहानने ताब्यात घ्यावी. तसेच ज्यांना घरे मिळाली पण त्यांनी भाड्याने दिले असेल तर भाडेकरू रिकामे करावे, असेही सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com