मुसळधार पावसाने रस्त्यालगतचा भाग वाहून गेला

road
road

यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी ते माहूर महामार्गावरील कोसदनी गावाजवळ मोठ्या पुलाच्या बाजूचा रपटा, रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने वाहून गेला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली आहे.

या महामार्गाचे चौपदरीकरण काम सुरू आहे. भोपाळ येथील दिलीप बिल्डकाँन कंपनी ते करीत आहे. पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. वाहतुकीसाठी बाजुला रपटा (मातीचा ढिगारा असलेला पुल ) काढण्यात आला होता. परंतु परिसरात काल, गुरुवारी (ता. 27) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हा लहान पूल (रपटा) वाहून गेला. या पुलावरून विदर्भ ते मराठवाडा व तीर्थक्षेत्र माहूरची प्रचंड वाहतूक असते. रात्री 3 वाजता सुदैवाने पूल तुटल्याचे लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दुतर्फा रात्रीपासून जमलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाश्यांची मोठी हेळसांड होत आहे. पूल दुरुस्तीचे काम चालू असून वाहतुकीसाठी संध्याकाळपर्यंत मोकळा करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com