वैनगंगा नदीने गिळली शेतकऱ्यांची जमीन; भूमिहीन बळीराजाचे पुनर्वसन कधी होणार? 

Landless farmers are waiting for Rehabilitation in Bhandara district
Landless farmers are waiting for Rehabilitation in Bhandara district
Updated on

सिहोरा (जि. भंडारा) : तुमसर तालुक्‍यातील बपेरा गावापासून वैनगंगेचे पात्र विस्तारत आहे. त्यामुळे गत 20 वर्षांपासून शेकडो शेतकरी भूमिहीन झाले. प्रशासनाकडून रेंगेपार (पांजरा) येथील काही घरांचे पुनर्वसन केले. मात्र, भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन होणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गोंदिया जिल्ह्यातून येणाऱ्या वैनगंगेला बपेरा येथे बावनथडी नदी मिळते. यानंतर जिल्ह्यात वाहणाऱ्या वैनगंगेचे पात्र गेल्या 20 वर्षांपासून विस्तारत आहे. यामुळे नदीकाठावरील बपेरा, सुकळी (नकुल), देवरीदेव, गोंडीटोला, पिपरीचुन्नी, वांगी, मांडवी, परसवाडा, रेंगेपार, पांजरा, तामसवाडी, उमरवाडा, बोरी, कोष्टी व बाम्हणी आदी गावे धोक्‍याच्या पातळीत आली. नदीकाठावरील शेकडो शेतकऱ्यांची बागायती शेतजमीन दरवर्षी कमीकमी होत जात आहे. नदीला येणाया पुरामुळे नदी काठावरील गावात पावसाळ्यात पाणी शिरते. कमी उंचीच्या पुलावर पुराचे पाणी आल्यास ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प होते. यामुळे गावकऱ्यांचे संपर्क दरवर्षीच तुटला जातो.

वैनगंगा नदीचे पात्र दरवर्षी विस्तारत असल्याने काठावरील शेतकऱ्यांना मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची बागायती शेती कमी झाली आहे. दोन्ही काठावरील काही अल्प भूधारक शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे बेपत्ता झाली आहे. ज्यांनी सिंचन विहिरी बांधल्या किंवा शेतीवर कर्ज घेतले. मात्र, प्रत्यक्षात शेती वाहून गेली आहे. परंतु, 7/12 वर घेतलेल्या कर्जाचा बोजा कायम आहे. त्यांच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात बाबत समस्या निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडे कोणतीही योजना नाही. पुराच्या आपत्तीमुळे हे शेतकरी संकटात आल्याने त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

रेंगेपारचे अंशतः पुनर्वसन

नदीचे पात्र दरवर्षी पुढे सरकत असल्याने रेंगेपार या गावातील नदीकाठावरील काही घरे वाहून जाण्याचे संकट असले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी गावाचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी सतत दोन ते तीन वर्ष आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयानंतर हे प्रकरण मंत्रालयात गेले. परंतु, श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात रेंगेपार या गावाचे पुनर्वसन रखडले. शेवटी धोक्‍याच्या पातळीत असलेल्या काही कुटुंबांना शासकीय योजनेतून घरकुल देण्यात आले. आता ही कुटुंबे नवीन वसाहतीत राहत आहेत.

कुटुंबाची दोन एकर शेती नदीच्या पात्रात वाहून गेली आहे. आणखी माझ्या सारख्या बऱ्याच शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे. त्याबाबत शासनाच्या विभागाला सांगितले. परंतु कोणतीही आजपावेतो उपाययोजना झाली नाही.
- रूपाबाई छगनलाल खंगार,
भूमिहीन शेतकरी, बपेरा

बावनथडी व वैनगंगा नदी काठावरील गावात पुराचे पाणी शिरल्यानंतर शेतकरी व नागरिकांचे नुकसान झाले. या पूरग्रस्तांना शासनाने तातडीने मदत दिली पाहिजे. बपेऱ्यातील 85 हेक्‍टर शेती नुकसान ग्रस्तांना मोबदला देण्याची गरज आहे.
- किशोर रहांगडाले, 
सामाजिक कार्यकर्ता बिनाखी

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com