मोहन नगरात वराहांचा मुक्‍त संचार; नागरिकांच्या आरोग्याची समस्या 

Large number of pigs in Mohan nagar wardha
Large number of pigs in Mohan nagar wardha

वर्धा : मोहननगर परिसरात वराहांचा संचार वाढला आहे. कधी काळी या वराहांचा घरात प्रवेश होतो. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे या वराहांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नगरसेविका रंजना सुरेश पट्टेवार यांनी पालिकेचे मुख्याधिकारी विपिन पालीवाल यांना निवेदनातून केली आहे.

प्रभाग क्रमांक 4 मोहन नगर येथील सौरभ धनवटे व बीसानी यांच्याकडून परिसरातील वराहांच्या त्रासाच्या तक्रारी सतत येत आहेत. मोहननगर येथे दिवसेंदिवस हा त्रास वाढत असल्याचे या परिसरातील नागरिकांकडून कळविण्यात आले आहे. येथील नागरिकांना सकाळपासून या वराहांच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या भागात नगरसेविका म्हणून रंजना पट्टेवार काम करीत आहेत. सध्या सकाळपासूनच त्यांच्याकडे वराहांच्या त्रासाच्या तक्रारी येत आहेत. नगरसेविका म्हणून अनेकदा आरोग्य विभागाचे विशाल सोमवंशी यांच्याकडे वरील विषयाचा पाठपुरावा करणे सुरूच आहे. परंतु, अद्यापही कायमस्वरूपी न्याय मिळाला नाही.

केवळ वराहच नाही तर सुदामपुरी, मोहिनीनगर परिसरात मोकाट श्‍वानांचाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मोकाट श्‍वानांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही अद्यापही कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आला नाही. वर्धा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या टीमला त्वरित पाठवून वरील प्रमाणे दोन्ही अतिमहत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नाची त्वरित गंभीर दखल घेऊन मोहननगर येथील वराहांचा व सुदामपुरी, मोहिनीनगर येथील मोकाट श्‍वानांचा त्वरित बंदोबस्त करून प्रभागातील नागरिकांना दिलासा द्यावा ही विनंती.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com