esakal | दीड वर्षाच्या चिमुकलीने बापाचे अंत्यदर्शन घेताच उपस्थितांनी फोडला टाहो, शहीद कैलास दहीकर अनंतात विलीन
sakal

बोलून बातमी शोधा

last rites of martyr soldier kailas dahikar in achalpur of amravati

वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी दीड वर्षाच्या चैतालीला आणताच सारेच गहिवरले. याप्रसंगी अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

दीड वर्षाच्या चिमुकलीने बापाचे अंत्यदर्शन घेताच उपस्थितांनी फोडला टाहो, शहीद कैलास दहीकर अनंतात विलीन

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : तालुक्‍यातील पिंपळखुटा येथील शहीद कैलास दहीकर या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कैलास यांचा लहान भाऊ केवल याने प्रेताला अग्नी दिला. यावेळी हजारोंचा जनसमुदाय अंत्यदर्शनासाठी उसळला होता. 'शहीद कैलास दहीकर अमर रहें' या घोषणा देत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आप्तांचा आक्रोश वातावरणातील शांतता चिरत होता. वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी दीड वर्षाच्या चैतालीला आणताच सारेच गहिवरले. याप्रसंगी अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

हेही वाचा - फोन आला म्हणून कडाक्याची थंडी असूनही गेला गच्चीवर अन् सकाळी आढळला युवकाचा मृतदेह   

कुलूमनाली येथे बुधवारी (ता.२३) सायंकाळी कैलास दहीकर हे कर्तव्य बजावत असताना तंबूला आग लागली. त्यात त्यांचा होरपळून मृत्यू झाला. कुलूमनाली येथून त्यांचे पार्थिव आज, रविवारी सरकारी वाहनाने पिंपळखुटा गावात पोहोचले. आपल्या गावचा सुपूत्र देशसेवेसाठी कामी आल्याचा अभिमान व्यक्त करतानाच कैलास पुन्हा भेटणार नाही, या विचाराने गावकरी अस्वस्थ होते. कैलास यांचे पार्थिव पाहताच आईवडील, पत्नी, भाऊबहीण यांनी आक्रोश केला. चार वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

हेही वाचा - चक्क १५० किलो सोन्या-चांदीच्या कमानीने केले होते आमदाराचे स्वागत, प्रचंड गर्दीत एकही...

यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, डॉ. कमलताई गवई, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, पंचायत समिती सभापती कविता बोरेकार, जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर, सुखदेव पवार, आमदार केवलराम काळे, प्रभूदास भिलावेकर यांच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले. 
 

loading image
go to top