esakal | या भाजप नेत्याने उड्डाणपुलाला दिले बाळासाहेबांचे नाव, अजूनही मैत्री कायम?
sakal

बोलून बातमी शोधा

late Balasaheb thakare name at Chandrapur flyover

काही नेते पक्ष किंवा सत्तेपेक्षा उंच असतात. त्यांचा विचार आकाशाने हेवा करावा, इतका मोठा असतो. स्व. बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदयसम्राट म्हणून बहुसंख्य जनतेच्या मनात विश्‍वास निमार्ण करण्यात यशस्वी ठरले होते. हे राज्य छत्रपतींच्या विचारानेच पुढे जाईल, असे त्यांना वाटत होते, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

या भाजप नेत्याने उड्डाणपुलाला दिले बाळासाहेबांचे नाव, अजूनही मैत्री कायम?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या जुना वरोरा नाका चौकातील रेल्वे उड्डाणपुलाचे बुधवारी (ता. 19) शिवजयंतीच्या मुहुर्तावर उद्‌घाटन करण्यात आले. या उड्डाणपुलाला "स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल' असे नाव देण्यात आले. उड्डाणपुलाला शिवसेना प्रमुखांचे नाव देण्याचा व युती पुन्हा जुळण्याशी काहीही संबंध नाही. एकत्र येऊ तेव्हा येऊ, आम्ही विचारांशी बांधील आहोत, असे आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. 

चंद्रपुरात बुधवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाचे भाजपचे माजी मत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. भाजपच्या ताब्यात असलेल्या चंद्रपूर महापालिकेने 2012 मध्येच या संबंधी ठराव घेतला होता. त्याची अंमलबजावणीही करण्यात आली. सोहळ्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्तेही थेट मंचावर उपस्थित राहिल्याने सेना-भाजप युतीचा धागा पुन्हा एकदा जुळवण्याचा प्रयत्न आहे का? अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. 

ठळक बातमी - Video : देवदर्शनासाठी गेले अन्‌ दैव आड आले; भीषण अपघातात सहा ठार

काही नेते पक्ष किंवा सत्तेपेक्षा उंच असतात. त्यांचा विचार आकाशाने हेवा करावा, इतका मोठा असतो. स्व. बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदयसम्राट म्हणून बहुसंख्य जनतेच्या मनात विश्‍वास निमार्ण करण्यात यशस्वी ठरले होते. हे राज्य छत्रपतींच्या विचारानेच पुढे जाईल, असे त्यांना वाटत होते, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

फडणवीस सरकारच्या काळात सेना-भाजप युती असताना मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. परंतु, भाजप माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यास आग्रही होता. आता चंद्रपुरातील उड्डाणपुलाला का असेना भाजपने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्याने नवल वर्तवले जात आहे.

याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला म्हणजेच 23 जानेवारी 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजपमधील तमाम मोठ्या नेत्यांनी बाळासाहेबांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली होती. युती तुटल्यानंतर बाळासाहेबांची ही पहिलीच जयंती होती. त्यामुळे या निमित्ताने भाजप-सेनेला लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न करीत आहे का, असा प्रश्‍न विचारला जात होता, असेही मुनगंटीवार म्हणाले. 

महत्त्वाची बातमी - म्हणून देवेंद्र फडणवीसांना चढावी लागली कोर्टाची पायरी, लिहून द्यावे लागले हे...

विचारातील समानता कोणी तोडू शकत नाही

आम्ही सत्तेत सोबत नसलो, तरी शिवसेना आणि भाजप यांच्या विचारातील समानता कोणी तोडू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना समजणारे आणि जाणणारे, चांदा ते बांदा असलेल्या युवक-युवतींच्या हृदयापर्यंत तो विचार पोहोचवणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव उड्डाणपुलाला देणे, याचा अर्थ युती किंवा सत्तेशी जोडता कामा नये, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.