esakal | हिंगणघाट जळीतकांड: बचाव पक्षाचे वकील पुन्हा गैरहजर; उलट तपासणीचे कार्य अपूर्णच
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगणघाट जळीतकांड: बचाव पक्षाचे वकील पुन्हा गैरहजर; उलट तपासणीचे कार्य अपूर्णच

हिंगणघाट जळीतकांड: बचाव पक्षाचे वकील पुन्हा गैरहजर; उलट तपासणीचे कार्य अपूर्णच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा): अंकिता पिसुड्‌डे जळीतकांड (Hinganghat case) प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी मृप्ती जाधव व फ्रांसिस परेरा यांची साक्ष झाल्याने बचाव पक्षाकडून उलट तपासणी सोमवारी (ता. तीन) होणार होती. मात्र, या तपासणीकरिता बचाव पक्षाचे वकील भूपेंद्र सोने (Bhupendra Sone) न्यायालयात (Court) गैरहजर राहिल्याने ही सुनावणी झाली नाही. त्यामुळे सरकारी विधीज्ज्ञ उज्ज्वल निकम (Advocate ujwal Nikam) यांच्या पदरी निराशा पडली. (lawyer of Vikesh absent for hearing for Hinganghat case)

हेही वाचा: दुर्दैवी! घरातच आढळला माय-लेकीचा मृतदेह; तपासणी होताच समोर आलं धक्कादायक वास्तव

अंकिता पिसुड्‌डे जळीतकांडातील बचाव पक्षाचे ॲड. सोने यांच्या वतीने त्यांचे सहकारी सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन. माजगावकर यांच्या समोर अर्ज सादर करून ॲड. सोने हे प्रकृतीच्या कारणामुळे गैरहजर आहेत, असे सांगितले. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव यांच्या उलट तपासणीचे कामकाज होऊ शकले नाही.

हेही वाचा: काय सांगता! मेळघाटातील गावे होणार लखपती? चिखलदऱ्यात प्रशासनाचा निर्धार

३ व ४ मे रोजी होणारी सुनावणी ॲड. सोने यांच्या गैरहजेरीमुळे टळली. न्यायालयाने या प्रकरणातील पुढील तारीख ७ मे दिली आहे. विशेष सरकारी विधीज्ज्ञ उज्ज्वल निकम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाजाची पाहणी करीत होते. पण त्यांच्या पदरी निराशा पडली. ॲड. निकम यांना स्थानिक जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील ॲड. दीपक वैद्य यांनी सहकार्य केले.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image
go to top