esakal | काय सांगता! मेळघाटातील गावे होणार लखपती? रोहयोच्या माध्यमातून चिखलदऱ्यात प्रशासनाचा निर्धार
sakal

बोलून बातमी शोधा

काय सांगता! मेळघाटातील गावे होणार लखपती?  चिखलदऱ्यात प्रशासनाचा निर्धार

काय सांगता! मेळघाटातील गावे होणार लखपती? चिखलदऱ्यात प्रशासनाचा निर्धार

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) ः शेतकऱ्यांचे उत्पादन अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावे यासाठी रोहयोच्या माध्यमातून चिखलदरा तालुक्‍यातील गावे लखपती करण्याचा निर्धार प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

हेही वाचा: दुर्दैवी! घरातच आढळला माय-लेकीचा मृतदेह; तपासणी होताच समोर आलं धक्कादायक वास्तव

शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्याचे नियोजन रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आले आहे. रोजगार हमी विभाग तसेच मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली क्‍लस्टर फॅसिलिटेशन प्रोग्राम अंतर्गत चिखलदरा तालुक्‍यातील गावे लखपती करण्याचा निर्धार प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. यासाठी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ आणि तहसीलदार माया माने यांनी संबंधित गावातील पदाधिकारी, अधिकारी तसेच शेतकऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

यावेळी मृद व जलसंधारणाची कामे रोहयोच्या माध्यमातून करून शेतीसाठी संरक्षित सिंचन व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. जेणेकरून संरक्षित सिंचनामुळे शेतकरी अधिकाधिक उत्पादन घेऊ शकेल व त्यामुळे त्याचे वार्षिक उत्पन्न वाढून तो लखपती होऊ शकतो. यामध्ये शेतकऱ्यांना पारंपरिक पिके घेण्यापेक्षा भाजीपालावर्गीय पिके तसेच फुलशेती, फळबाग करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे नियोजन करण्यात आले. सोबतच गावागावांमध्ये मोठ्या प्रमाणात रोहयोच्या माध्यमातून सिंचन विहिरी, गोदाम, ग्रामपंचायत भवन, बचतभवन, रस्ते, नाली, शोषखड्डे, जैतादेही पॅटर्न अंतर्गत अंगणवाडी परिसरातील भौतिक विकासाची कामे, बंधारे इत्यादी कामे रोहयोच्या माध्यमातून करून गावांचाही विकास साधण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा: मेळघाटातील आरोग्य विभाग हादरला; विविध पदांवरील दोन डॉक्टरांचा मृत्यू

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे निवडताना त्याचा केंद्रबिंदू शेतकरी असावा आणि रोहयोच्या माध्यमातून जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करून शेतकऱ्यांचे उत्पादन अधिकाधिक वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावे यासाठी चिखलदरा तालुक्‍यातील प्रशासन, सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा, प्रकल्पाधिकारी मिताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी प्रकाश पोळ आणि तहसीलदार माया माने कार्य करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image