बुलडाणा एसटी आगाराचा कसला हा कारभार

st
st

बुलडाणा : गेल्या काही महिन्यांपासून बुलडाणा आगारातील बसेस नादुरुस्त आणि रस्त्यातच तांत्रिक अडचण निर्माण होत असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, याचा प्रत्यक्ष रोष वाहक व चालकांवर येत असल्यामुळे महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांनी आता बुलडाणा आगारातील कारभाराविषयी एल्गार करत बसेस, इटीआयएम मशिन देण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

बुलडाणा आगारातील बसेस परिवहन विभागाच्या कायदे व नियमानुसार आगारातील बहुतांश बसेस मार्गावर चालण्यासाठी धोकादायक परिस्थितीत आहे. वाहनांमुळे मार्गातच बिघाड होऊन जिवाला धोका निर्माण होत आहे. परिवहन खात्याच्या नियमानुसार वाहन चालकांना देण्याअगोदर रेडीपार्किंगमध्ये उभे असलेली वाहनामध्ये स्पेअर टायर, जॅक, टामी, पाना, पाइप, हॉर्न, वायफर तसेच प्रथमोपचार पेटी, अश्‍निशामक, वायफर, ब्रेक लाइट, पार्किंग लाइट, रिव्हर्स लाइट, ताडपत्री, दोन्ही साइडच आरशे योग्य स्थितीत हॉर्न, रुटबोर्ड व बोर्ड ब्रॅकेट, आवश्यक डिझेल, इंजिन ऑईल, स्टेअरिंग ऑइल, कुलट तसेच रस्त्यावर चालण्यास योग्य असलेल्याची खात्री पाळी प्रमुख यांनी दिल्याशिवाय चालकाला वाहन देण्यात येऊ नये तसेच जबरदस्तीही करण्यात येऊ नये. परंतु, बुलडाणा आगारात चालकाला आगार व्यवस्थापकांच्या नावाची धमकी देऊन वाहन परीक्षक हे नादुरुस्त तसेच खिळखिळ वाहन देत आहे. 

सर्रासपणे चालकाची फसवणूक
चालकाने मार्गावर नेण्याआधी बस तपासून बसमधील दोषांचे शेरा मारत असता तीच बस दुसऱ्या चालकाला नवीन लॉगशीटवर देण्यात येते व चालकाची फसवणुकीचे काम सर्रास चालू आहे. त्यामुळे बुलडाणा आगारातील अनेक बससेचचे गेल्या काही महिन्यापासून रस्त्यातच बिघाड तसेच मोठ्या प्रमाणात तांत्रिक दोष होत असून, याबाबत वरिष्ठांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात येत नाही. 

दोष असलेल्या बसेस कामगिरीवर
दोष निर्माण झाल्यानंतर त्यांचा रोष चालक व वाहकांना सहन करावा लागत आहे. अनेक बसेस बुलडाणा आगारात वेगवेगळ्या कारणामुळे खराब असताना सुद्धा आगार प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे चालकांना कामगिरीवर न्याव्या लागत आहे. कामगिरी सुरू होऊन मार्गस्थ वाहन बिघाड झाल्यामुळे किलोमीटर पूर्ण होत नसल्याने कोणत्याही प्रकारचा नियम नसताना कर्मचाऱ्यांना पी2 हजेरी लावण्यात येत आहे. सदरचा प्रकार नियमबाह्य आहे. परिपत्रकीय सूचना असताना सुद्धा केवळ किलोमीटर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जात असून, परिपत्रकाचाही भंग होत आहे. 

अन्यथा आंदोलनाची इशारा
वाहकाच्या इटीएमआय मशीन आगाराला 192 मंजूर असताना केवळ 70 ते 75 मशीनच उपलब्ध आहे. मशीन चार्जिंग नसणे, मॅन्युअल ट्रे वापराकरिता पुरेसे तिकीट व वे बिल असणे अत्यावश्यक आहे. परंतु, त्या वाहकांना उपलब्ध होत नाही. सदर मागण्यांसंदर्भात 15 दिवसाच्या आत दखल घेऊन परिस्थिती पूर्वपदावर आणावी, अन्यथा लोकशाही मार्गाने व परिवहन खात्याच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे काम करण्यात येईल व त्यानंतर टप्याटप्याने बुलडाणा आगार कृती समितीमार्फत आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

यांनी दिले निवेदन
निवेदनावर एसटी कामगार संघटना डेपो सचिव शे. लतिफ शे. कालू, डेपो अध्यक्ष अरविंद लांडगे, महाराष्ट्र एसटी कामगार सेना डेपो अध्यक्ष संजय उंबरहंडे, डेपो सचिव बबन चव्हाण, कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना डेपो अध्यक्ष अनिल वाळके, डेपो सचिव दीपक मिसाळकर, बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना डेपो अध्यक्ष रत्नदीप हिवाळे, डेपो सचिव कुंदन गवई, महाराष्ट्र एसटी काँग्रेस संघटना डेपो अध्यक्ष पी. एल. वारे, डेपो सचिव गोपाल काकडे यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

बुलडाणा आगारातील बसेसच्या घटना
मेहकर ते बुलडाणा बस क्रमांक एमएच 20 बीएल 1806 बसचे एक्सल रॉड तुटून मागील चाक निखळले, बुलडाणा ते बिरसिंगपूर बस क्रमांक एमएच 40 8218 या बसचे एक्सल रॉड तुटून बस रस्त्याच्याखाली उतरली, बुलडाणा ते अजिंठा बस क्रमांक एमएम 14 बीटी 0648 स्टेरिंग जॅम झाल्यामुळे संगम तलावाच्या काठावर उतरली, महिन्याभरापूर्वी ब्रेक रोल झाल्यामुळे बुलडाणा ते लोणार एमएच 40 9588 या बसला अपघात होऊन मेंढ्या मरण पावल्या. बस क्रमांक 1813 मध्ये ऑईल व डिझेल इंजिनवर सांडल्यामुळे चिखली बसस्थानकात पेट घेतला होता. 

आगारात अस्वच्छतेचा कळस
आगार परिसर आणि बसस्थानक परिसर स्वच्छता नसताना, गाड्या नीट धुतल्या जात नसल्याने प्रवासी तक्रार करत आहेत. पुरुष विश्रांतीगृह तसेच महिला विश्रांतीगृहाची सुद्धा स्वच्छता वेळेवर होत नाही आणि या कामापोटी खासगी कंत्राटदाराला मनमर्जी साधता येत असतानाही कोणीही काहीच बोलत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com