सुरपाम मृत्यूप्रकरणाचा तपास एलसीबीकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

यवतमाळ : पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे मारोती सुरपाम याने विष पिऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूला वणीचे ठाणेदार व कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप करीत ठाणेदाराविरुद्घ मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, या मागणीसाठी गेल्या सोमवार(ता. आठ)पासून येथील तिरंगा चौकात उपोषण सुरू करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांकडे प्रकरणाचा तपास देण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर शुक्रवारी (ता. 12) उपोषणाची सांगता करण्यात आली.

मारोतीचा विवाह सहा वर्षांपूर्वी झाला होता. पती-पत्नीत पटत नसल्याने ती माहेरी राहत होती. गेल्या 24 जूनला पत्नीला आणण्यासाठी तो सासरी गेला. तेथील मंडळीने वाद केल्याने तक्रार देण्यासाठी मारोती वणी पोलिस ठाण्यात गेला. ठाणेदार वैभव जाधव व इतर कर्मचाऱ्यांनी त्याला डांबून मारहाण केली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. वणी ठाणेदारांसह कर्मचाऱ्यांविरुद्घ मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी गेल्या सोमवारपासून यवतमाळच्या तिरंगा चौकात उपोषण सुरू करण्यात आले. मारोती सुरपाम प्रकरणाचा तपास एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्याकडे देण्यात आला; तर धीरज तुरणकर याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे देण्यात आला. लेखी आश्‍वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. उपोषणकर्त्यांमध्ये बोनशा सुरपाम, गीत घोष, स्वप्नील धुर्वे, संतोष पेंदोर, बंडू सिडाम, मंगेश कोकाटे आदींचा समावेश होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LCB investigates Suram's death