बंडोबांना थंडोबा करण्यासाठी नेत्यांची दमछाक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर : आमदारांची स्वप्न पाहणाऱ्याना पक्षाने तिकीट नाकारल्याने नाराजांनी बंड थोपटत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवाराच्या विजयासाठी मतांचे विभाजन टाळण्याकरिता या बंडोबांना "थंडोबा' करण्यासाठी नेत्यांची चांगलीच धावपळ केली जात आहे. या बंडोबांची मनधारणी केली जात असून काहींनी प्रतिसाद दिल्याचे समजते. तर माघार न घेणाऱ्यांवर पक्षातून बरखास्त करण्यासोबत "इडा पिडा'चा इशाराही दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी उद्या (ता. 7) सोमवार शेवटचा दिवस असल्याने त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी गेली पाच वर्षे अनेकांनी परिश्रम घेतले. उमेदवारी मिळण्यासाठी पक्षाकडे दावाही सादर केला. पक्षश्रेष्ठीने काहींचा दावा मान्य केला तर काहींचा फेटाळून लावला. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांनी बंडाचा झेंडा उचलत अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यातील बाराही मतदारसंघातून 206 लोकांनी अर्ज दाखल केला होता. यातील 28 उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. यात काही पक्षांचे बंडखोरही होते. उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने पक्षाला काही प्रमाणात दिलासा मिळाला. 178 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. यात अनेक जण बंडखोर आहे. भाजप-सेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीची युती-आघाडी आहे. युती-आघाडीच्या विरोधात जाऊनही काहींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यामुळे मतांचे विभाजन होण्याचा धोका पक्षश्रेष्ठींना आहे. त्यामुळे या बंडोबांना शांत करण्याचा प्रयत्न पक्षांच्या नेत्यांकडून सुरू आहे. यात काही प्रमाणात यशही आल्याचे सांगण्यात येते. मात्र, काही उमेदवारांनी आता माघार नाही अशी भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

"नॉट रिचेबल'
निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या बडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यांची मनधारणीही करण्यात आली. शांत करण्यासाठी काहींना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तर काहींची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. काहींनी आपला फोनच बंद करून ठेवला होता. तर काही उमेदवार अज्ञातवासात गेले आहेत. अनेकांचे मोबाईल नॉट रिचेबल असल्याचा "मॅसेज' वरिष्ठांना दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leaders rally to cool down rebels