कष्टकरी भूमीपूत्राची उदयोगक्षेत्रात झेप

संतोष थोरहाते
रविवार, 17 जून 2018

हिवरा आश्रम (बुलडाणा) : हर सपने को अपने सांसो में रखों... हर मंजिल को अपने बाहो में रखों... हर जित आपकी है.. बस अपने लक्ष्य को अपनी निगाहों में रखों...या काव्याप्रमाणे कायम स्वप्नांचा पाठलाग करून त्यासाठी भूक, तहान हरवून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवितरपणे संघर्ष करण्याचे धैर्य फारच थोडया व्यक्तीजवळ असते. याचाच प्रत्यय विवेकानंद विद्या मंदिराचा माजी विद्यार्थी संदीप माणिकराव जाधव याच्या रूपाने दिसून येतो.

कुठल्याही प्रकारच्या उदयोग व्यवसायाची पार्श्वभूमी नसतांना केवळ जिद्द, चिकाटी व व्यवहारातील आव्हाने पेलण्याच्या बळावर संदीप जाधव याने पुणे येथे सोयाबीन पासून तयार होणा-या विविध खाद्य पदार्थ निर्मितीचा उदयोग यशस्वीपणे सुरू केला. संदीप माणिकराव जाधव याने पुणे येथे सोयाबीन पासून निर्मित सोया दुध, सोया मँगो मिल्क,सोया कॉफी मिल्क, सोया चॉकलेट मिल्क, सोया पनीर, सोया बिस्कीट, सोया कुकीज, सोया आईस्क्रीम, सोया आटा, सोया सॉस अशी विविध उत्पादने निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. त्याचा हा  उद्योग अल्प काळातच भरभराटीला आला असून संदीप ग्रामीण भागातील युवकांसाठी यशस्वी उदयोजक बनला आहे

Web Title: Leap in the field of labor farm