कंपनीच्या कामानिमित्त दोेघेही आले एकत्र, नंतर त्याने केली सोबत राहण्याची मागणी...

संतोष तापकिरे
Sunday, 9 August 2020

संदीप अशोक राजपूत (वय 32, रा. धारणी) असे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पीडित विवाहिता व संदीप हे दोघेही एका कंपनीचा प्रसार, प्रचार व विक्रीचे काम करीत होते.

अमरावती ः ती विवाहित अन्‌ दोन मुलांची आई. तो सुद्धा विवाहित. एकेदिवशी त्याने तिला रस्त्यात गाठले आणि म्हणाला, ‘‘तू तुझ्या पतीला सोड दे अन्‌ केवळ माझीच हो. जन्मभर तुझा सांभाळ करीन,’’ असे आमीष दाखवून त्याने त्या विवाहितेचे दोन वर्षे लैंगिक शोषण केले. अखेर पीडितेच्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचार करणाऱ्या त्या पुरुषाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 

संदीप अशोक राजपूत (वय 32, रा. धारणी) असे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पीडित विवाहिता व संदीप हे दोघेही एका कंपनीचा प्रसार, प्रचार व विक्रीचे काम करीत होते. सोबत काम करीत असल्याने त्यांची साहजिकच जवळीक निर्माण झाली. त्यांच्यात चर्चाही रंगत होती. आपण दोघेही विवाहित असल्याची एकमेकांना पूर्वकल्पना होती. एकेदिवशी संदीपने तिच्यापुढे आपल्या मनातील भावना व्यक्त केली. तो तिला म्हणाला, ‘‘पतीला सोडून दे, मी तुझा जीवनभर सांभाळ करतो. तू फक्त माझीच हो,’’ असे म्हणून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर सतत दोन वर्षांपासून तो तिचे लैंगिक शोषण करीत होता. 

अवश्य वाचा- ती ढसाढसा रडत होती, कारण सर्व मागण्या पूर्ण करूनही बोहल्यावर चढण्यास त्याने दिला नकार 

मात्र, एकेदिवशी आपण फसविलो गेल्याचे तिच्या लक्षात आले. या पुरुषाने आपल्याला जीवनभर सांभाळ करण्याचे आमीष दाखवून सतत दोन वर्षे आपल्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप पीडितेने धारणी पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीतून केला. गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी संदीपच्या आई आणि बहिणीने पीडितेच्या घरासमोर येऊन तिला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. त्यात ती जखमी झाली. त्या विवाहितेने आपल्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदविल्याचे कळताच संदीप फरार झाला, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अवश्य वाचा- भयंकर! पारधी बेड्यावर सात वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक अत्याचार

या प्रकरणात कायद्यातील तरतुदीनुसार पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली. पीडितेने केलेल्या आरोपाची चौकशी सुरू आहे. 
- लहू मोहंदुळे, पोलिस निरीक्षक, धारणी ठाणे. 
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leave your husband. I will take care rest of my life! He gave lure to a woman