बापरे! जीवंत रुग्णाचे पाय पोहोचले थेट शवागारात अन् सत्य समोर येताच उडाली तारांबळ

Legs of man admitted in hospital are found in Morgue room in Amravati
Legs of man admitted in hospital are found in Morgue room in Amravati

अमरावती ः  रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाच्या घटना नेहमीच घडत असतात. यामुळे नातेवाईकांना आणि रुग्णालयाला त्रासही सहन करावे लागतात. मात्र ही घटना वाचून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. 

चार दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास लोणी ठाण्याच्या हद्दीत राजू नंदू सेलोकार (वय 20, रा. उमरला, मध्य प्रदेश) या युवकाचा अपघात झाला. त्यात मांडीपासून त्याचे दोन्ही पाय कटले. त्याला आधी इर्विनमध्ये व रात्रीच नागपूरला हलविले. परंतु जखमी रुग्णासोबत त्याचे कटलेले पाय न पाठविता ते इर्विनच्या शवागारात ठेवण्यात आले. इर्विनमधील पोलिसांनी लोणी ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी जखमीचे पाय ताब्यात घ्यावे, याकरिता नागपूर येथे उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या नातेवाइकांना माहिती दिली.

अपघातात कटलेल्या एका रुग्णाच्या दोन्ही पायांची परस्परच विल्हेवाट लावण्यात आल्याची खळबळजनक घटना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. विशेष म्हणजे संबंधित रुग्णालच्या नातेवाईकांना याची कोणतीच माहिती दिल्या गेली नसल्याची ओरड आहे.

चार दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास लोणी ठाण्याच्या हद्दीत राजू नंदू सेलोकार (वय 20, रा. उमरला, मध्य प्रदेश) या युवकाचा अपघात झाला. त्यात मांडीपासून त्याचे दोन्ही पाय कटले. त्याला आधी इर्विनमध्ये व रात्रीच नागपूरला हलविले. परंतु जखमी रुग्णासोबत त्याचे कटलेले पाय न पाठविता ते इर्विनच्या शवागारात ठेवण्यात आले. इर्विनमधील पोलिसांनी लोणी ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी जखमीचे पाय ताब्यात घ्यावे, याकरिता नागपूर येथे उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या नातेवाइकांना माहिती दिली.

लोणी पोलिस आणि रुग्णाचे नातेवाईक दोन दिवसांनी राजू सेलोकारचे कटलेले पाय ताब्यात घेण्यासाठी पोलिसांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात पोचले. त्यावेळी पोलिस आणि रुग्णाच्या नातेवाइकांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. नातेवाईक पोहोचण्यापूर्वीच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनाने बेवारस समजून कटलेल्या पायांची विल्हेवाट नातेवाईक पोहोचण्याच्या दोन दिवसांपूर्वीच लावली होती. 

इर्विनने महापालिकेला पत्र देऊन त्या कटलेल्या पायांची विल्हेवाट लावून टाकली. लोणी पोलिसांनी ज्यावेळी निवासी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे विचारणा केली त्यावेळी शवागारातील कर्मचाऱ्यांपासून तर कटलेल्या पायांची विल्हेवाट लावणारे पत्र तयार करणाऱ्या डॉक्‍टर, संबंधित कर्मचाऱ्यांकडे विचारणा झाली. इर्विनमध्ये कार्यरत ग्रामीण पोलिसांकडेही चौकशी करण्यात आली. परंतु या संपूर्ण प्रक्रियेत पोलिसांचा संबंध नव्हता. ही प्रक्रिया पूर्ण केली ती इर्विन प्रशासनानेच.

नातेवाइकांचा समजूतदारपणा

इर्विन प्रशासनाकडून झालेली चूक लक्षात घेता पोलिस व डॉक्‍टरांनी रुग्णाच्या नातेवाइकांना घटनाक्रम सांगितला. नातेवाईक समजूतदार होते म्हणून बरे झाले, अन्यथा समजूत काढताना प्रशासनाची पंचाईत झाली असती.

जखमी राजू सेलोकार याच्या कटलेल्या पायांची विल्हेवाट लावण्यासाठी लोणी पोलिस, नातेवाइकांसह इर्विनमध्ये पोहोचले होते. परंतु नातेवाईक तसेच पोलिसांच्या संमतीविनाच कटलेल्या पायांची विल्हेवाट लावल्या गेली होती.
-सुरेंद्र अहेरकर, 
पोलिस निरीक्षक, लोणी ठाणे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com