Leopard Attack: 'चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला'; इटिहाडोह धरण परिसरात काकासोबत फिरायला, १०० फूट जंगल परिसरात नेले ओढत

Etihadhoh Dam Leopard Attack: धरण बघितल्यावर काकाची करंगळी पकडून परत जात असताना गर्दीचे ठिकाण असलेल्या विश्रामगृहाजवळील परतीच्या मार्गावर झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने विहानवर हल्ला चढवला. त्याच्या पायाला व नंतर गळ्याला पकडून जवळपास १०० फूट जंगल परिसरात ओढत नेले.
Etihadhoh Dam Tragedy: Leopard drags a child 100 feet into the forest while walking with uncle.
Etihadhoh Dam Tragedy: Leopard drags a child 100 feet into the forest while walking with uncle.Sakal
Updated on

गोंदिया: अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटिहाडोह धरणातून विसर्ग झाल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने धरणातील विहंगमय दृश्य बघण्याकरिता येत आहेत. अशातच शनिवारी (ता. ३०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आपल्या काकासोबत पर्यटनासाठी आलेल्या विहान भौतोष रॉय (४, रा. दिनकरनगर) या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने त्याला जवळपास १०० फूट जंगल परिसरात ओढत नेले. यात विहान गंभीर जखमी झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com