Leopard Attack: लघुशंकेला गेला अन् दबा धरून बसलेल्या बिबट्यानं केला हल्ला; पुढं जे घडलं ते होतं भयानक!
Gondia News: गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात पाच वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. संजयनगरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
केशोरी (जि. गोंदिया) : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगावजवळच्या संजयनगर येथे गुरुवारी (ता. २५) लघुशंकेसाठी अंगणात गेलेल्या पाच वर्षीय बालकावर दबा धरून असलेल्या बिबट्याने हल्ला केला. यात बालकाचा मृत्यू झाला.