Leopard Attacks: गेल्या वर्षभरात १३१ जनावरे ठरली बिबट्याचे भक्ष्य; कोंढाळी परिसरात हल्ल्यांचे सत्र सुरुच, शेतकऱ्यांत भीतीचे सावट
Wildlife: कोंढाळी परिसरात वाघ व बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी त्रस्त; गेल्या वर्षभरात १३१ जनावरांचा बळी. शेतकरी वर्गावर भीतीचे सावट; शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी.
कोंढाळी : परिसरात वाघ व बिबट्यांच्या सलग हल्ल्यांमुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. मागील काही दिवसांत खैरी व बोरगाव शिवारात तब्बल चार जनावरांचा बळी गेला असून, त्यामुळे भीतीचे सावट पसरले आहे.