
सध्या शेतशिवारात कापूस व तुरीचे पीक असून, कापूस वेचणीचेही काम शेतमजूर करीत आहेत. शिवाय ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर फवारणी करण्यात येत आहे.
पुसद (जि. यवतमाळ) : पुसदजवळून सात किलोमीटरवर असलेल्या जुना कार्ला शेतशिवारात गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. त्यातच काही शेतकरी व शेतमजुरांना बिबटा दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन सावंत यांना यासंदर्भात कळविण्यात आले आहे.
हेही वाचा - विवाह सोहळा बनलाय वन-डे मॅच, मुंडावळ्यांऐवजी देखण्या मास्कचा साज
सध्या शेतशिवारात कापूस व तुरीचे पीक असून, कापूस वेचणीचेही काम शेतमजूर करीत आहेत. शिवाय ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर फवारणी करण्यात येत आहे. बुधवारी (ता.2) कार्ला शिवारातील शेतात काम करीत असताना विठ्ठल ढोकणे व प्रवीण मंदाडे यांना प्रथम बिबटा दिसला, तर कार्ला-मांडवा शिवारात गुरुवारी (ता.3) शेतात शेळ्या चारत असताना 25 फूट अंतरावर गजानन धाड यांना बिबटा दिसला. त्यांनी आरडाओरड करताच बिबट बाजूच्या शेतात उडी मारून निघून गेला. शुक्रवारी (ता.4) कार्ला-माणिकडोह शिवारात तुरीवर फवारणी करताना दत्ता धाड यांना कपाशी पिकात बिबट्या आढळून आला. बिबट्याच्या भीतीने त्यांनी फवारणी बंद करून घरचा रस्ता धरला. ही घटना शेतमालक व कार्ला येथील गवळी समाजाचे अध्यक्ष किरण पुलाते यांना सांगितली. त्यांनी लगेच वनरक्षक कैलास राठोड यांना फोन करून ही घटना सांगितली.
हेही वाचा - अमरावतीतील मृत्यूप्रकरणाला वेगळे वळण; संशयाच्या आधारे बाळाच्या आईला अटक
बिबट्याची लांबी साधारण तीन फूट असून, उंची शेळी एवढी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बिबट्याच्या शेतशिवारातील वास्तव्यामुळे शेतकरी व शेतमजूर भयभीत झाले आहेत. बिबट्याच्या भीतीमुळे शेतमजूर महिला कापूस वेचणीला जात नाहीत, तर गुरेढोरे चरण्यासाठी कोणीही एकटे दुकटे जात नाही. सुदैवाने अद्याप, पाळीव गुरांवर वा मनुष्यावर हल्ला करण्याची घटना घडलेली नाही. वनविभागाने ताबडतोब बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - महाआघाडीच नव्हे तर निवडणूक विभागाचीही ऐतिहासिक कामगिरी; दीड लाख मतपत्रिका मोजायला ३०...
शेतात वाघ पाहिला असल्याची माहिती नागरिक देत असले, तरी तो बिबट असावा. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, शेतात एकटे दुकटे जाण्याचे धाडस करू नये. मी स्वतः जातीने कार्ला शेतशिवारात जाऊन प्रत्यक्षस्थितीचे निरीक्षण करणार आहे. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल.
- सचिन सावंत, वनपरिक्षेत्राधिकारी, शेंबाळपिंपरी.