अंबाझरीत बिबट्याने केली डुकराची शिकार 

 leopard news in nagpur ambazari
leopard news in nagpur ambazari

नागपूर  : अंबाझरी तलावाच्या मागील भागातील अंबाझरी राखीव वनक्षेत्र परिसरातील मेट्रोच्या "लिटिल वूड गार्डन'मध्ये काम करणाऱ्या मजुराला बिबट्या दिसल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभाग सतर्क झाला. गुरुवारी दिवसभर आणि आज सकाळपर्यंत ड्रोनच्या साहाय्याने संपूर्ण परिसराचे चित्रीकरण करून बिबट्याचा शोध घेतला. बिबट्या ड्रोनमध्ये दिसला नाही. मात्र, गुरुवारी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी वाडीकडील जंगलात डुकराची शिकार तोंडात घेऊन जाताना बिबट्या कॅमेरा ट्रॅपमध्ये आढळून आला. नागपूर विभागात रात्रीच्या वेळी ड्रोनच्या साहाय्याने चित्रीकरण करण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. 

बिबट्याचे दर्शन झालेल्या परिसरात रात्री 11 वाजताच्या सुमारात वन विभागाच्या कर्मचारी आणि वन परिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांच्या मार्गदर्शनात गस्त करण्यात आली. कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्रही तपासण्यात आले. मात्र, त्यात बिबट दिसला नाही. त्यानंतर रात्री 12 वाजता रात्रीचे चित्र घेणारे इन्फ्रा रेड ड्रोन उडविण्यात आला. सकाळी पाच वाजेपर्यंत हा ड्रोन सतत जंगलाच्या संपूर्ण परिसरात उडून चित्रिकरण करीत होता. दरम्यान, त्यात काही दृष्य टिपण्यात आले. मात्र, ते बिबटच आहे का हे ओळखणे शक्‍य नव्हते. हे मोहिम पाच वाजेपर्यंत राबविल्यानंतर सकाळी वन विभागाचे कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सकाळीच गस्त केली. 

सकाळी वाडी परिसराला लागून असलेल्या अंबाझरी राखीव वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक 798 मधील कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट डुकराची शिकार तोंडात पकडून जात असल्याचे चित्र टिपल्याचे लक्षात आले. गस्ती दरम्यान बिबटच्या पाऊल खुणा व विष्टा आढळून आली. उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्‍ल आणि मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते याकडे लक्ष ठेवून आहेत. निनावे यांच्या मार्गदर्शनात वनपाल प्रवीण बडोले, सचिन ताकसांडे, वनरक्षक टेकाम, बसिने, कुर्वे यांनी गस्त केली. तसेच नागरिकांच्या व वन्यजीवाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. "लिटील वूड' आणि अंबाझरी जैवविविधता पार्कमध्ये बिबट्याचे अस्तित्व असल्याने हा परिसर पर्यटक आणि सकाळी फिरणाऱ्यांसाठी बंद केला आहे. 

विहिरीत पडलेल्या नीलगायीची सुटका 

कोंढाळी वनपरिक्षेत्रामधील धामणगाव शिवारालगतच्या रघुनाथ मुंगमाते यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या नीलगायीला जेसीबीच्या साह्याने दोरखंड बांधून बाहेर काढण्यात आले. रघुनाथ मुंगमाते (रा. जामगड) यांनी विहिरीत नीलगाय पडल्याची माहिती वनरक्षक सुरेंद्र पाटील यांना दिली. पाच वर्षे वयाच्या या नीलगायीचे वजन अधिक असल्याने बाहेर काढण्यात यश आले नाही. त्यामुळे तत्काळ कोंढाळी येथून जेसीबी मागविण्यात आला. जेसीबीच्या बकेटमध्ये रमेश गजभिये यास बसवून नीलगायीला दोरखंडाने बांधले. सावधगिरीने नीलगायीला यशस्वीरीत्या विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com