अमरावतीत पुन्हा बिबट्याची दहशत, पीडीएमसी परिसरात दिसल्या पाऊलखुणा, वनविभागाकडून शोधमोहीम

Leopard Scare in Amravati : परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्याने महाविद्यालय प्रशासनासह रुग्ण, नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leopard Scare in Amravati

Leopard Scare in Amravati

esakal

Updated on

अमरावतीतील वर्दळीच्या आणि रुग्णांसह विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्याने महाविद्यालय प्रशासनासह रुग्ण, नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून वनविभागालाही याची माहिती देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com