
लाखनी : लाखनी वनपरिक्षेत्रातील मुरमाडी/तूपमधील मौजा डोंगरगाव या गावी शेतकरी शेतात काम करीत असताना डोंगरगाव ते रामपूरी पांदन रोडाच्या पाण्याचा पाईपमध्ये बिबट नर अडकून बसल्याची माहिती गावकऱ्यांकडून वनरक्षक बोरकर यांना शुक्रवारी (ता. २७) ला माहिती मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बिबट्यास जेरबंद करून निसर्ग अधिवासात सोडले.