Leopard Rescue : हिंगण्यात बिबट्या विहिरीत पडला, वनविभागाने रेस्क्यू करून दिले जीवनदान
Wildlife Rescue : हिंगणा तालुक्यातील देवळी पेंढरी शिवारात शेतातील विहिरीत पडलेला बिबट्या वनविभागाच्या रेस्क्यू टीमने मोठ्या प्रयत्नाने सुखरूप बाहेर काढला. यानंतर त्याच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार केले जाणार असून, त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.
हिंगणा : तालुक्यातील देवळी पेंढरी शिवारातील रमेश उईके यांच्या शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडला. त्याला वनविभागाच्या रेस्क्यू टिमने सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिले.