नरभक्षक बिबट्या अडकला पिंजऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

वरोरा (चंद्रपूर) : दीड महिन्यात पाच व्यक्तींचा बिबट्याने बळी घेतला. दोघांना गंभीर जखमी केले. शुक्रवारी (ता. 14) ज्या ठिकाणी महिलेचा बळी बिबट्याने घेतला तिथेच पिंजरा लावण्यात आला. त्याच पिंजऱ्यात बिबट अडकला. बिबट्या अडकल्याने वनविभागाने सुटकेचा निःश्‍वास सोडला. असे असले तरी अजूनही एक बिबट याच भागात ठाण मांडून असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

अर्जुनी येथील निर्मला बबन श्रीरामे ही महिला वायगाव (भो.) शेतशिवारात कापूस वेचत होती. तेव्हाच बिबट्याने तिच्यावर हल्ला करून ठार केले. बिबट्याचा हा पाचवा बळी असल्याने नागरिक संतप्त झाले होते. सहा तासांनी महिलेचा मृतदेह वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. बिबट्याला पकडण्याकरिता वनविभागाचे मागील काही दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. 14 डिसेंबरला ज्या ठिकाणी महिलेला ठार केले त्या ठिकानी वनविभागाने पिंजरा लावला. पिंजऱ्यात बोकड व कोंबडी ठेवली. मृत महिलेच्या कपड्याचे गाठोडे ठेवले. बिबट पिंजऱ्यातील कोंबडी फस्त करून पळ काढण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याचवेळी तो अडकला.
बिबट्याला जेरबंद करून मोहुर्लीला नेण्यात आले. त्याचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्षे आहे. पुन्हा एक बिबट याच भागात आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Leopard trapped news