बिबट खेडे, शहरांच्या दिशेने

Leopard
Leopard

जंगले कमी झाल्याचा परिणाम; राज्यात ८५० ते ९०० बिबट 
नागपूर - उसाची शेती ही प्रजनन आणि संगोपनासाठी सुरक्षित स्थान असल्याने बिबट मानवी वस्तीत घुसखोरी करीत आहेत. कुत्रा हे बिबट्याचे आवडते खाद्य असल्यानेही तो कायम गावाच्या आजूबाजूला वास्तव्यात असतो. वाघांची वाढती संख्याही बिबट्यांना मानवी वस्तीकडे धाव घेण्यास कारणीभूत ठरत आहे. असे असले तरी बिबट्याने मानवावर हल्ला केल्याच्या घटना इतर वन्यप्राण्यांच्या तुलनेत कमी असल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. 

जंगलात वाघ आणि रानकुत्र्यांसारखे इतर प्राणीही त्यांचं भक्ष्य पळवतात. प्रसंगी त्यांचा जीवही घेतात. या अनुभवातून बिबट्यांना मनुष्यवस्तीजवळच्या विरळ जंगलाच्या अधिवासाची निवड केली आहे. वाघांपासून सुरक्षित अधिवासाची निवड करून बिबट वस्तीकडे येऊ लागले आहेत. महाराष्ट्रात रस्ते, विकासकामे, विविध प्रकल्पांसाठी जमिनीचे अधिग्रहण मोठ्या प्रमाणात होत आहे. गावात विपूल खाद्य उपलब्ध झाल्यानेही तो गाव अथवा शहराच्या शेजारी स्थिरावला आहे. पाळीव जनावर, जंगलात लावण्यात येणाऱ्या आगी यामुळेही बिबट्याच्या मनुष्यवस्तीजवळ वावर वाढला आहे. आठवड्यातून एकदा तरी शहरात अथवा गावात बिबट्या आल्याची घटना दिवसेंदिवस पुढे येत आहेत.

राज्यात ८५० ते ९०० बिबट असल्याचा अंदाज आहे. वनविभाग वन्यजीवांच्या संवर्धनाला विशेष महत्त्व देत असल्याने बिबट्यांची संख्या वाढू लागली आहे. वाघ आणि बिबट्याचे शिकारीही वनविभागाने ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.

 कुत्रा आवडते खाद्य असल्याने बिबट्या गावाच्या शेजारी कायम वास्तव्य करत आहे. वनविभाग वन्यजीव संवर्धनासाठी विविध योजना राबवून मानवाचे जंगलावरील अवलंबत्व कमी करीत आहेत. त्यामुळेही बिबट्यांसह वन्यप्राण्यांची संख्या सतत वाढत आहे. असे असले तरी बिबट्याने मानवावर हल्ला केल्याच्या घटना इतर वन्यप्राण्यांच्या तुलनेत कमी आहेत.
- किशोर मिश्रीकोटकर, सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com