आठवड्याभरापासून सोमलपुरात बिबट्याचा वावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

अर्जुनी-मोरगाव तालुक्‍यातील बोंडगावदेवीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमलपुरात बिबट्याचा वावर असल्याने गावकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. या बिबट्याने बुधवारी (ता. 29) गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या तुलाराम राघोबा डोंगरवार यांच्या शेतात गाईची शिकार केली.

बोंडगावदेवी (जि. गोंदिया) : परिसरात बिबट्याची दहशत असल्याने बुधवारी सायंकाळी सहा वाजता पार्वता हातझाडे या महिलेने शेताजवळून गाईला गावाकडे हाकलून लावले होते. पण गाय गावात न आल्याने बिबट्याने तिची शिकार केल्याचे दिसून आले.

 

त्यानंतर गुरुवारी (ता. 30) शेतालगत गाईचा मृतदेह दिसून आला. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.

 

गावकऱ्यांत दहशत; वनविभागाने बंदोबस्त करावा

विभागाने गुरुवारी (ता. 30) सकाळी गाईच्या मृतदेहाजवळ कॅमेरे लावून ठेवले होते. अखेर बिबट्याने गुरुवारी (ता. 30) रात्री गाईला फस्त केल्याचे दिसून आले. तिसऱ्या दिवशी बिबट्या त्या ठिकाणी आला. मात्र गावकऱ्यांच्या आरडाओरडीमुळे त्याने जंगलात पळ काढला.

हेही वाचा : दोन बिबट्यांसह पाच वन्यप्राण्यांची शिकार...चंद्रपूर हादरले

गाईची केली शिकार

मेलेली गाय चुडीराम झोडे यांच्या मालकीची आहे. तिची किंमत अंदाजे किंमत 15 ते 20 हजार रुपये आहे. वनविभागाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बाक्‍टी, गुढरी, येरंडी या गावात बिबट्याची दहशत पसरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopord terror in gondia district for a week