पराक्रमी वाघाचा प्रदेश म्हणून महाराष्ट्राची ओळख करू या : वनराज्यमंत्री फुके

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

चंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशांमध्ये 2 हजार 967 वाघ असल्याचे जाहीर केले आहे. आज जागतिक व्याघ्रदिनाला वन्यजीव, वनांवर प्रेम करणाऱ्या निसर्गप्रेमींच्या साक्षीने पराक्रमाच्या गाथा लिहिणाऱ्या महाराष्ट्राची ओळख पराक्रमी वाघांचा प्रदेश म्हणून व्हावी यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहन राज्याचे वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी आज येथे केले.

चंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशांमध्ये 2 हजार 967 वाघ असल्याचे जाहीर केले आहे. आज जागतिक व्याघ्रदिनाला वन्यजीव, वनांवर प्रेम करणाऱ्या निसर्गप्रेमींच्या साक्षीने पराक्रमाच्या गाथा लिहिणाऱ्या महाराष्ट्राची ओळख पराक्रमी वाघांचा प्रदेश म्हणून व्हावी यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहन राज्याचे वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी आज येथे केले.
येथील प्रियदर्शिनी सभागृहात सोमवारी (ता. 29) जागतिक व्याघ्र दिनानिमित्त अभिमान महाराष्ट्राचा हा शानदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. आजच्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 व संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत उत्कृष्ट गावांनादेखील पुरस्कार देण्यात आला. याशिवाय वन विभागातर्फे आयोजित विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नाना श्‍यामकुळे, पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वन संरक्षक यु.के. अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी, वनविभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक अनिल काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव, प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक रामाराव, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांची उपस्थिती होती.
यावेळी संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत वनव्यवस्थापन राबविणाऱ्या उत्कृष्ट गावांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मांजर सुभा या नाशिक वनवृत्ततील अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्‍याच्या गावाला प्रथम पुरस्कार देण्यात आला. नाशिक वन वृत्तातील दिंडोरी तालुक्‍यातील गौरीपाडा महाजे व औरंगाबाद वनवृत्तातील हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्‍यातील येलदरी गावाला द्वितीय पुरस्कार विभागून देण्यात आला. कोल्हापूर वनवृत्तातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्‍यातील निढळ या गावाला व ठाणे वनवृत्तातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यातील दहागाव या गावाला तृतीय पुरस्कार विभागून देण्यात आला. औरंगाबाद वनवृत्तातील लातूर जिल्ह्यातील एकुरगा या गावाला मराठवाडा प्रशासकीय विभागाचे बक्षीस देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 साठी संपूर्ण राज्यातून व्यक्तिगत पुरस्कारासाठी पुणे विभागातून रानमळा प्रकल्पाचे प्रणेते पोपट तुकाराम शिंदे तालुका खेड जिल्हा पुणे यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला. पुणे विभागातूनच द्वितीय पुरस्कार मुक्काम पोस्ट पुसेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथील मनोज वसंत फरतडे यांना देण्यात आला. तर तृतीय पुरस्कार वर्धा येथील प्रसन्ना अविनाशराव बोधनकर यांना देण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let's identify Maharashtra as the territory of the mighty tiger: Minister of State for Phuke