esakal | मुली भाव देत नाहीत म्हणून तरुणाचं थेट आमदारांना पत्र!
sakal

बोलून बातमी शोधा

letter

मुली भाव देत नाहीत म्हणून तरुणाचं थेट आमदारांना पत्र!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : गावातील समस्या सुटाव्या, विकासकामे करण्यात यावी, यासाठी आमदारांना निवेदन देणे, पत्रप्रपंच करणे, हे सर्वांना माहीत आहे. मात्र, आपल्याला अजून कुणी पटली नाही. आपल्याला मुलींनी भाव द्यावे म्हणून प्रोत्साहन देण्याची अफलातून मागणी करणारे पत्र एका युवकाने आमदारांना लिहिले आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातील एका तरुणाचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

मुली भाव देत नाही म्हणून नाराज तरुणाने थेट आमदारांनाच पत्र लिहिले आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातील तरुणाचे हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. क्षेत्राच्या आमदारांकडे मुलगी पटत नसल्याची तक्रार या तरुणाने केली आहे. तालुक्यात भरपूर मुली आहेत. मात्र, एकही मुलगी पटत नसल्याची चिंता त्याने पत्रातून मांडली आहे. अर्जदार खेड्यात राहतो. राजुरा, गडचांदूर येथे तो दररोज ये-जा करीत असतो. परंतु, त्याला एकही मुलगी पटत नाही, असा मजकूर पत्रात त्याने लिहिला आहे.

हेही वाचा: बाह्यरुग्ण बंद असताना एंजिओप्लास्टी; डॉक्टरांनी मरणाच्या दारातून काढले बाहेर

अनेक पोरांना गर्लफ्रेंड आहेत, हे बघून जीव जळून राख होत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. आमदारांना विधानसभा क्षेत्रातील मुलींना अर्जदाराला भाव देण्यासाठी प्रोत्साहन देण्याची विनंती त्याने केली आहे. पत्राच्या शेवटी ‘अर्जदार भूषण जांबुवंत राठोड’ असे नाव लिहिले आहे. मात्र, हा अर्जदार नेमका कोण आहे आणि कुठे राहतो, याबाबत अद्याप अनभिज्ञता आहे. दुसरीकडे आमदार सुभाष धोटे यांनी अशा आशयाचे पत्रच मिळाले नसून, क्षेत्रातील कार्यकर्त्यांना हा युवक शोधण्यास सांगण्यात आल्याचे म्हटले आहे.

loading image
go to top