#MondayMotivation : हिरामण झोडे यांच्या किडनीदानातून दोघांना जीवनदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

गोंदिया येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून अभियंता पदावरून निवृत्त झालेले वासुदेवराव हिरामण झोडे यांना ब्रेनडेड (मेंदूमृत) घोषित केल्यानंतर कुटुंब दु:खात बुडाले. अशा परिस्थितीतही नजीकच्या डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार कुटुंबीयांनी अवयदानाचा निर्णय घेत समाजासमोर आदर्श निर्माण केला. किडनीदानातून नागपुरातील दोन व्यक्तींना जीवनदान मिळाले. नेत्रदानातून दोघांच्या डोळ्यांमध्ये उजेडाची पेरणी करण्यात आली. विशेष असे की, उपराजधानीत मेंदूमृत व्यक्तीचे हे शंभरावे किडनीदान आहे.

नागपूर - गोंदिया येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून अभियंता पदावरून निवृत्त झालेले वासुदेवराव हिरामण झोडे यांना ब्रेनडेड (मेंदूमृत) घोषित केल्यानंतर कुटुंब दु:खात बुडाले. अशा परिस्थितीतही नजीकच्या डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार कुटुंबीयांनी अवयदानाचा निर्णय घेत समाजासमोर आदर्श निर्माण केला. किडनीदानातून नागपुरातील दोन व्यक्तींना जीवनदान मिळाले. नेत्रदानातून दोघांच्या डोळ्यांमध्ये उजेडाची पेरणी करण्यात आली. विशेष असे की, उपराजधानीत मेंदूमृत व्यक्तीचे हे शंभरावे किडनीदान आहे.

झोडे यांच्या मेंदूपेशीमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे न्यू इरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. परंतु, उपचाराला दाद मिळत नसल्याचे डॉक्‍टरांच्या लक्षात आले. डॉक्‍टरांनी नातेवाइकांना तशी सूचना दिली. यानंतर झोडे कुटुंबीयांशी डॉ. विवेक लांजे यांनी अवयवदानासंदर्भात समुपदेशन केले.

नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेच विभागीय अवयवदान समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे आणि समन्वयक वीणा वाठोरे यांच्याशी संपर्क साधला. यांच्या सहकार्यातून किडनीच्या प्रतीक्षेतील व्यक्तींचा शोध घेण्यात आला. नियमाप्रमाणे एक किडनी न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दान करण्यात आली. येथे 40 वर्षीय व्यक्तीला तर मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये 59 वर्षीय व्यक्तीला किडनी प्रत्यारोपित करून करून जीव वाचवण्यात आला. महात्मे नेत्र रुग्णालयात नेत्रदान करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life Saving by Kidney Donation Motivation