बाहेरून आणले म्हणून ठेवले अंधविद्यालयातील तात्पुरत्या कारागृहात; त्याने केले संधीचे सोने

Lifelong prisoner Kovid passes out of hospital in Amravati
Lifelong prisoner Kovid passes out of hospital in Amravati
Updated on

अमरावती : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा उपभोगणारा कैदी कुणाचेही लक्ष नसल्याचे बघून संदर्भसेवा रुग्णालयाच्या कोविड रुग्णालयातून पसार झाला. पसार कैद्याच्या शोधासाठी पोलिसांची गुरुवारपासून (ता. २८) धावपळ सुरू आहे.

पसार कैदी हा यवतमाळ येथील रहिवासी आहे. त्याचे नाव शेख सलमान शेख अहमद (वय २६) असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध यवतमाळ येथे खुनाचा गुन्हा दाखल होता. तेथील न्यायालयाने त्याला २७ डिसेंबर २०२० रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यानंतर यवतमाळ कारागृहातून त्याला अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात पाठविले.

बाहेरून आलेला सिद्धदोष किंवा न्यायाधीन बंदी यापैकी कुणीही असला तरी त्याला आधी अंधविद्यालयाच्या इमारतीत असलेल्या तात्पुरत्या कारागृहात ठेवले जाते. कोविड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना कारागृहाच्या मुख्य इमारतीमध्ये आणले जाते. शेख सलमान या कैद्यालासुद्धा २७ डिसेंबर २०२० रोजी तात्पुरत्या कारागृहात ठेवले.

कोरोना चाचणीसाठी २० जानेवारी २०२१ रोजी पोलिसांनी त्याला कोविड रुग्णालयात दाखल केले. शेख सलमानवर कोविड रुग्णालयात पोलिसांच्या उपस्थितीत उपचार सुरू होते. गुरुवारी (ता. २८) सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास कुणाचे लक्ष नसल्याचे बघून त्याने तेथून पळ काढला. गाडगेनगर पोलिसांना त्यासंदर्भात घटनेची माहिती देण्यात आली. 

पोलिसांच्या देखदेखीत सुरू होता उपचार
शेख सलमान हा कैदी कारागृहाच्या नव्हे तर पोलिसांच्या देखरेखीत कोविड रुग्णालयात उपचार घेत होता. 
- रमेश कांबळे,
अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com