बालगायकांसाठी स्वरवैदर्भी लिटल चॅम्प स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

वर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे सावंगी (मेघे) येथील सांस्कृतिक महोत्सवानिमित्त एक सप्टेंबरला बालकुमार गायकांसाठी "स्वरवैदर्भी लिटल चॅम्प' विदर्भस्तरीय हिंदी सिनेगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त स्वरवैदर्भीच्या महाअंतिम स्पर्धेत गांधीगीतांचाही समावेश राहणार आहे. विजेत्यांना एकूण 54 हजार रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात येतील.

स्वरवैदर्भी स्पर्धेचे हे सतरावे वर्ष आहे. यावेळी सहा ते 16 वयोगटातील बालकुमार गायकांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम 22 हजार, द्वितीय 11 हजार व तृतीय सात हजार रुपये रोख पुरस्कार देण्यात येतील. याशिवाय, प्रत्येकी 2 हजार रुपयांचे एकूण सात प्रोत्साहन पुरस्कार व सन्मानचिन्हही देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता स्पर्धकाने 30 ऑगस्टपर्यंत प्रवेशपत्र भरावयाचे आहे. प्रवेशपत्रासोबत वयाचा दाखल जोडणे अनिवार्य आहे. निवडफेरी एक सप्टेंबरला सकाळी 10 वाजता सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित आहे. यावेळी, स्पर्धकाला हिंदी चित्रपटातील गीताचे केवळ ध्रुपद व एक कडवेच सादर करावयाचे आहे. स्पर्धकांसाठी संवादिनी, तबला व अन्य वाद्यांची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येईल. या स्वरचाचणी फेरीतून 10 बालकुमार गायकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. ही महाअंतिम स्पर्धा आठ सप्टेंबर रोजी सांस्कृतिक महोत्सवातील मुख्य कार्यक्रमात घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी स्वरवैदर्भीचे संयोजक संजय इंगळे तिगावकर (9765047672) किंवा सुनील रहाटे (9921287408) यांच्याशी संपर्क साधावा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Little champ contests for children's vocalists