अत्यंत दुर्दैवी! रिमझिम पावसात खेळण्याचा तिला आवरला नाही मोह आणि घडली हृदयद्रावक घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Little girl is no more due to electric shock in Amravati district

चिकि उर्फ स्वामिनी अजय दिवे  वय ८ वर्ष असे मृत चिमुकलीचे नाव असून रिमझिम पावसात अंगणाच्या परिसरात ती खेळत होती. दरम्यान विहिरीजवळ असलेल्या एका झाडाचे पान तोडण्याकरिता ती गेली असता

अत्यंत दुर्दैवी! रिमझिम पावसात खेळण्याचा तिला आवरला नाही मोह आणि घडली हृदयद्रावक घटना

धामणगाव रेल्वे (अमरावती) : रिमझिम पाऊस आला की अंगणात गोळा झालेल्या चिमुकल्यांना पाण्यात खेळण्याचा  आवरत जात नाही. मात्र असे पाण्यात खेळणे चांगलेच अंगलट आले असून धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाढोणा येथील दहा वर्षे चिमुकलीचा विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दुर्देवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

चिकि उर्फ स्वामिनी अजय दिवे  वय ८ वर्ष असे मृत चिमुकलीचे नाव असून रिमझिम पावसात अंगणाच्या परिसरात ती खेळत होती. दरम्यान विहिरीजवळ असलेल्या एका झाडाचे पान तोडण्याकरिता ती गेली असता विहिरी मध्ये असलेल्या मोटर मधील जिवंत विद्युत तारांमधून पाऊस आल्याने संचारलेल्या विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसला. यात चिकि हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

जाणून घ्या - अमरावतीला लाभल्या तडफदार पहिल्या महिला पोलिस आयुक्त

दरम्यान स्थानिकांच्या मदतीने विद्युत प्रवाह बंद करून तिला लगेच ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर तिचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला वाढोणा येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर मुलीच्या आकस्मित जाण्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पावसादरम्यान काळजी राखावी

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस आल्यास सर्वत्र जमीन ओली होते विहीर किंवा शेतात असलेल्या  मोटर इं मधील वायर तुटून त्याचा जमिनीशी स्पर्श होऊन  विद्युत प्रवाह संचारण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे  पावसाळ्यात शेती किंवा परिसरात वावरताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य विद्युत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित धामणगाव रेल्वेचे उपकार्यकारी अभियंता उदय राठोड यांनी केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ