‘लॉयड मेटल’ची पोलिसांत तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

एटापल्ली (जि. गडचिरोली) - सुरजागड लोहप्रकल्प खाणीत माओवाद्यांनी घडवून आणलेल्या अग्नितांडवाच्या घटनेच्या चार दिवसांनंतर लॉयड मेटल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आज, सोमवारी एटापल्ली येथे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात माओवाद्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

बहुचर्चित एटापल्ली तालुक्‍यातील सुरजागड लोह प्रकल्पाच्या कामावरील ८३ वाहने माओवाद्यांनी शुक्रवारी (ता. २३) भरदिवसा जाळून टाकली. या घटनेनंतर या परिसरात दहशतीचे वातावरण असून येथे काम करणाऱ्या मजूर व वाहनचालकांमध्ये कमालीची भीती आहे. पोलिसांचा तपास सुरू असला तरी या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले जळीत वाहनांचे चालक मात्र काहीच बोलायला तयार नसल्याने पोलिसांनाही तपासात अडथळा येत आहे. 
आज दुपारी लॉयड मेटल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एटापल्ली येथे जाळपोळीच्या घटनेची तक्रार दिली. माओवाद्यांच्या अग्नितांडवामध्ये सुमारे पाच कोटींच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज असून अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे तीनशेच्या वर मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे.

Web Title: loal metal police complaint