लॉकडाउन इफेक्ट : वऱ्हाडात वीज वापर घटला; पहा काय आहे कारण

सागर कुटे
Thursday, 23 April 2020

महाराष्‍ट्रात महावितरणकडून नियमित 18 हजार मेगावॉट विजेचा पुरवठा केला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून लॉकडाउन असल्यामुळे अनेक उद्योग धंदे बंद आहे. 

अकोला : लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर उद्योग धंदे व इतर व्यवसाय बंद असल्याने वऱ्हाडात सर्वच प्रकारच्या विजेचा वापर घटल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यात 60 तर बुलडाणा जिल्ह्यात 50 मेगावॉटची विजेचा वापर कमी झाला आहे. मात्र, यामध्ये घरगुती वीज वापरात वाढ झाली असल्याची शक्यता आहे.

आजच्या आधुनिक युगात विजेचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तसेच लोकसंख्या वाढीचे प्रमाण जास्त असल्यामुळे आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक व्यक्तिच्या मागे किती वीज वापर लागतो याचा अंदाज आजपर्यंत आपण काढू शकलेलो नाही. महाराष्‍ट्रात महावितरणकडून नियमित 18 हजार मेगावॉट विजेचा पुरवठा केला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून लॉकडाउन असल्यामुळे अनेक उद्योग धंदे बंद आहे.

आवश्‍यक वाचा - सॅनिटेशन टनलचा वापर करता, मग हे वाचाच!

परिणामी, व्यावसायिक विजेची मागणी घटली आहे. अकोला जिल्ह्यात 60, बुलडाणा जिल्ह्यात 50 तर वाशीम जिल्ह्यात 29.2 मेगावॉटने मागणी घटली आहे. अकोला जिल्ह्यात महावितरणचे 5 लाख 25 हजार वीज ग्राहक आहेत. यामध्ये अकोला शहर 1.25 लाख, अकोला ग्रामीण 2.25 लाख तर अकोला ग्रामीणमध्ये 1.70 लाख ग्राहक आहेत. मात्र, यात घरगुती वीज वापरात वाढ झाली असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा - मौत-हयात अल्लाह के हाथ में है...ये कोरोना क्या चीज है!

घरी बसलेले नागरिक मनोरंजन म्हणून दूरचित्रवाणीवर विविध कार्यक्रम पाहात आहेत. विजेचा तांत्रिक बिघाड होऊन त्यांना त्रास होऊ नये म्हणून महावितरणने तांत्रिक अधिकारी व कर्मचारी सध्या मुख्यालयातच बसून आहेत. ग्राहांचा फोन येताच, बिघाड तत्काळ दुरुस्ती केला जात असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

लॉकडाउन आधी व नंतर विजेचा वापर (मेगावॉटमध्ये)
जिल्हा        आधी        नंतर        फरक

अकोला       141          81            60
वाशीम        99.2         70            29.2
बुलडाणा      280          230          50


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown effect: Power consumption decreases in akola, buldhana and washim district