Lok Sabha 2024: तब्बल दहा वर्षांनंतर PM मोदी आज चंद्रपूर दौऱ्यावर; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचाराचं फुंकणार रणशिंग

Lok Sabha 2024: चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत.
Lok Sabha 2024
Lok Sabha 2024Esakal

चंद्रपूर: विर्दभात निवडणूक प्रचार रंगू लागला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. ८) चंद्रपुरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजता मोरवा विमानतळाजवळील भव्य पटांगणावर ही सभा होणार आहे. तब्बल दहा वर्षांनंतर मोदी चंद्रपुरात येत आहेत.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत. सभेसाठी प्रशासनाकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पराभव झाला होता. काँग्रेसचे बाळू धानोरकर यांच्या विजयाने भाजपचे काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न भंगले होते.

Lok Sabha 2024
Eknath Shinde: महायुतीच्या सर्व उमेदवारांचा जोमाने प्रचार करा; शिंदेंच्या नेत्यांना सुचना

हा पराभव भाजप पक्षश्रेष्ठींच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यानंतर चंद्रपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची या दिशेने प्रयत्न सुरू करण्यात झाले. खुद्द मोदी यांनी चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तगडा उमेदवार देण्याच्या उद्देशातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणूक लढण्याचे आदेश दिले. मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचार सुरू केला आहे.

चंद्रपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यासाठी मोदी यांची उद्या येथे जाहीर सभा होत आहे. पंतप्रधान आशीर्वाद देण्यासाठी येत असल्याने मला अतिशय आनंद होत आहे, अशा भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

Lok Sabha 2024
मोठी बातमी! पाणी चोरी रोखण्यासाठी 8 जणांचे विशेष पथक; विजयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; कलबुर्गी जिल्हाधिकाऱ्यांनी मागितले उजनीतील 5 TMC पाणी, पण...

योगी आदित्यनाथ यांची आज हिंगणघाट, भंडाऱ्यात सभा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सोमवारी (ता. ८ एप्रिल) रोजी महायुतीच्या प्रचारासाठी विदर्भात येत आहे. भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील मेंढे व वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ भंडारा व हिंगणघाट येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Lok Sabha 2024
जन्म दाखला कसा काढतात? इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी 31 डिसेंबरपर्यंत 6 वर्षे पूर्ण आवश्यक; ‘RTE’तील 25 टक्के सोडून 75 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी मान्यता

योगी आदित्यनाथ यांची दुपारी १२ वाजता हिंगणघाट (जि. वर्धा) येथील टाका ग्राउंडवर, तर दुपारी ४ वाजता भंडारा शहरातील दसरा मैदानावर सभा होणार आहे. दोन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार व महायुतीचे नेते उपस्थितराहणार आहेत. हिंगणघाटातील सभेनिमित्त आमदार समीर कुणावार यांच्या मार्गदर्शनात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेता सभास्थळी भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com