Lok Sabha Election : उन्हाचा तडाखा अन् मुख्यमंत्र्यांची टोपी... महायुतीच्या उमेदवारासाठी एकनाथ शिंदेंचा वाशीममध्ये प्रचार

Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ता.24 रोजी वाशीम शहरात बाईक रॅली काढली
Lok Sabha Election 2024 CM Eknath Shinde Bike Rally rajarshri patil Election Campaign political news
Lok Sabha Election 2024 CM Eknath Shinde Bike Rally rajarshri patil Election Campaign political news

वाशीम : महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ता.24 रोजी वाशीम शहरात बाईक रॅली काढली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा अचानक ठरला.

दुपारी बारा वाजता हेलिकॉप्टरने वाशीम येथे मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहापासूनच बाईक रॅलीला सुरूवात झाली. रॅलीच्या समोर उघड्या चारचाकी वाहनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार भावना गवळी आमदार लखन मलिक, महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील होत्या. ही रॅली बसस्थानक चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक मार्गे छत्रपती शिवाजीमहाराज चौक येथे आली. तेथून रॅली बाकलीवाल विद्यालय मार्गे येवून रिसोड नाक्यावर रॅलीचा समारोप करण्यात आला.

उन्हाचा तडाखा अन् मुख्यमंत्र्यांची टोपी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रॅलीदरम्यान वेताची गोल टोपी घातली होती. त्यामुळे नागरीकांना मुख्यमंत्री ओळखू येत नव्हते. याबाबत नागरीकांनी मुख्यमंत्र्यांना आवाज दिल्यानंतर त्यांनी टोपी काढून ठेवली मात्र उन्हाचा तडाखा असल्याने पुन्हा टोपी घातली.

जल्लोष भावना गवळींचाच

येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात रॅली आल्यानंतर मुख्यमंत्री छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी खाली उतरले यावेळी निवेदकाने खासदार भावना गवळीचे नाव पुकारताच जमलेल्या गर्दीने एकच जल्लोष केला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com