lok sabha election EVM-VVPAT Second randomization completed
lok sabha election EVM-VVPAT Second randomization completedSakal

Lok Sabha Election : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची पुन्हा सरमिसळ; द्वितीय रँडमायझेशन पूर्ण

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ईव्हीएमची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली.

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरीत करायच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया निवडणूक निरीक्षक अनिमेश कुमार पराशर यांच्या हस्ते व जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने तसेच उमेदवाराचे प्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समोर सोमवार (ता.८) पूर्ण करण्यात आली.

यातून ईव्हीएम मशिन कोणत्या मतदान केंद्रावर जाणार याची निश्‍चिती झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ईव्हीएमची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली.

ही सरमिसळ करताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी संजय दैने यांनी उपस्थित उमेदवारांच्या प्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समक्ष पार पडलेल्या द्वितीय सरमिसळ प्रक्रियेनुसार विधानसभा मतदारसंघातील कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या क्रमांकाचे कंट्रोल युनीट, बॅलेट युनीट आणि व्हीव्हीपॅट वापरली जाईल, याबाबत माहिती दिली.

त्यानंतर ही सरमिसळ प्रक्रिया उमेदवारांचे प्रतिनिधी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष करण्यात आली आणि जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येक मतदान केंद्रासाठी निश्चित झाल्या.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी शिवशंकर टेंभुर्णे,

अतिरिक्त जिल्हा सूचना अधिकारी संजय त्रिपाठी, तहसीलदार रवींद्र होळी उमेदवाराचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी करण सयाम, राजेंद्र कोडापे, भारत खटी, गोपाळ खानवळकर, दत्तात्रेय खरवडे, मिलिंद लांडे, रोशन कोडापे व शेंडे आदी उपस्थित होते.

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या १८९१ असून यासाठी २३३० बॅलेट युनिट (बीयू), २३३० कंट्रोल युनीट(सीयू) आणि २५१७ व्हीव्हीपॅट उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी द्वितीय सरमिसळ प्रक्रियेनुसार आमगाव विधानसभा मतदारसंघातील ३११ मतदान केंद्रांसाठी (बीयू –४०४, सीयू – ४०४ आणि व्हीव्हीपॅट - ४३५),

आरमोरी विधानसभा मतदारसंघातील ३०२ मतदान केंद्रासाठी (बीयू –३६२, सीयू – ३६२ आणि व्हीव्हीपॅट - ३९२ ), गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील ३५६ मतदान केंद्रासाठी (बीयू – ४२७, सीयू –४२७ आणि व्हीव्हीपॅट - ४६२, अहेरी विधानसभा मतदारसंघातील २९२ मतदान केंद्रासाठी (बीयू –३५०, सीयू – ३५० आणि व्हीव्हीपॅट - ३७९ ,

ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातील ३१६ मतदान केंद्रासाठी (बीयू – ३९५, सीयू – ३९५ आणि व्हीव्हीपॅट -४२६ आणि चिमुर विधानसभा मतदारसंघातील ३१४ मतदान केंद्रासाठी (बीयू – ३९२, सीयू – ३९२ आणि व्हीव्हीपॅट - ४२३ ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट निश्चित झाल्या आहेत.

मोठे आव्हान पथक पोहोचवण्याचे

ईव्हिएम मशिनची सरमिसळ होऊन त्यांची स्थान निश्चित झाली असली, तरी प्रत्यक्ष मतदानासाठी पथक पाठविणे हे प्रशासनापुढचे मोठे आव्हान आहे. गडचिरोली जिल्हा अतिदुर्मग असून अनेक मतदान केंद्रापर्यंत पोहोचायला नीट रस्तेसुद्धा नाही. काही ठिकाणी जंगलातून जावे लागते. शिवाय माओवाद्यांचाही धोका असतो. या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाशी समन्वय साधून योग्य काळजी घेत हे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com