गौरविणार ‘साहित्य पंढरीचा विठ्ठल’ 

विवेक मेतकर
गुरुवार, 16 जानेवारी 2020

अकोला : आपल्या वाणी आणि लेखणीने रसिकांना वऱ्हाडी भाषेचे वेड लावणारे, अनेक नवोदित कविंना प्रेरणा देणारे लोककवी डॉ.विठ्ठल वाघ यांचा अमृत महोत्सव रविवार (ता.१९) श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आला. आहे. सोहळयामध्ये संयोजक म्हणून धनंजय मिश्रा व विठ्ठल कुलट हे आहेत अमृत महोत्सव सोहळयाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध हास्यकवी श्री किशोर बळी हे करणार असल्याचे गुरुवारी (ता.१६) आयोजित पत्रकार परिषदेत कळविण्यात आले.  

अमृत महोत्सवी सोहळा दुपारी १२.०० वाजता पार पडणार आहे. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवींची  यास उपस्थिती लाभणार आहे.  या अमृत महोत्सवामध्ये डॉ. विठ्ठल वाघ यांचे समग्र जीवनकार्याचे व त्यांच्या कवि साहित्याचे, लेखाचे, ओव्यांचे व त्यांचे समकालीन व नंतरच्या कवींचे, लेखकांचे लेख सर्वसामान्य वाचकांपर्यंत व अभ्यासपर्यंत पोहचविण्यासाठी ‘साहित्य पंढरीचा विठ्ठल’ हा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. अमृतमहोत्सव कार्यक्रमला अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकारचे राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांची उपस्थिती लाभणार आहे. सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक राजदत्त व ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे विनीत शिरीष वसंतरावजी धोत्रे तर स्वागताध्यक्ष म्हणून प्रा.तुकाराम बिडकर तसेच प्रशांत देशमुख व प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे हे निमंत्रक म्हणून उपस्थित राहतील.

दोन क्विंटलचा आगळा-वेगळा केक
लोककवी डॉ.विठ्ठल वाघ अमृत महोत्सव सोहळा रविवारी (ता.१९) दोन क्विंटलचा केक असणार आहे. मात्र, हा केक शेणाचा असून तो कापल्यानंतर एनसीसीचे विद्यार्थी एक हजार झाडांना खत देणार आहेत. 

कवी संमेलन
अमृत महोत्सवी सोहळ्यात कवी संमेलनाचे आयोजन नसेल तर नवलंच. धनंजय मिश्रा आणि विठ्ठल कुलट यांच्या संयोजनातून हे संमेलन दुपारी १.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. तसेच सुत्रसंचालनाची जबाबदारी किशोर बळी सांभाळणार असल्याने अर्थातच संमेलनही बहरणार आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lokkavi vitthal wagh amrut mahotsav at akola shivaji collage