Pankaja Munde : जटिल समस्या सोडविण्याची नरेंद्र मोदींकडूनच जनतेला अपेक्षा

दुसरबीड येथे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या.
Pankaja Munde
Pankaja Mundesakal

सिंदखेड राजा - देशातील लहान मोठ्या प्रश्नांसह जटील समस्या सोडविण्याची अपेक्षा जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच आहे. आगामी काळातही देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी महायुतीला साथ द्या असे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले.

दुसरबीड येथे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आ संजय रायमुलकर, आ.श्वेता महाले, माजी आमदार तोताराम कायंदे, विजयराज शिंदे, डॉ.शशिकांत खेडेकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

भाजप नेत्या पंकजा मुंढे पुढे बोलताना म्हणाले की, कोणाचे वाईट व्हावे असे वाटत नाही, सर्वांना शक्ती देणे हे माझे काम आहे, म्हणून मी याठिकाणी बीडमध्ये स्वतः उमेदवार असताना सुद्धा प्रचारासाठी आले आहे. खासदार प्रतापराव जाधव निवडून आल्यानंतर सिंदखेड राजा नगरीचा विकास विकास करा तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही.

देशाला जगातील सर्वात मोठे आर्थिक महाशक्ती बनवायचे असेल तर नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही. यावेळी हजारो नागरीक, महिला व युवक उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचलन भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com