ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमधील मते सेम टू सेम

file photo
file photo

नागपूर : ईव्हीएम मॅनेज होत असल्याची शंका दूर करण्यासाठी व्हीव्हीपॅटचा वापर यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत करण्यात आला. काही मोजक्‍या व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात आली. त्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतांची आकडेवारी सारखी निघाल्याने जिल्हा प्रशासनाची मोठी चिंता दूर झाली. सोबतच ईव्हीएमवरील शंकाकुशंकासुद्धा दूर झाल्या आहेत.
जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या. कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अनेक आक्षेप नोंदवले. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यास कोर्टातही खेचले. पटोले यांच्याविरोधात प्रशासनाने पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली. पटोले आणि गजभिये ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोपावर ठाम आहेत. स्ट्रॉंगरूममधील सीसीटीव्ही बंद, उमरेड येथील सीसीटीव्ही व डीव्हीआर चोरीला केल्याने त्यांच्या शंकेत तथ्य असल्याचेही बोलले जाते. राज्य निवडणूक आयोगाच्या चमूनेही तक्रारींची दखल घेतली होती. चौकशीसुद्धा केली. या सर्व पार्श्‍वभूमीवर व्हीव्हीपॅटच्या मोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात तफावत आढळली असती, तर कॉंग्रेसतर्फे मोठे भांडवल करण्यात आले असते. त्यामुळे प्रशासनही दडपणात होते.
न्यायालयाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटची नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. सहा विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण 30 व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात आली. ईव्हीएमध्ये झालेले पक्षनिहाय मतदान आणि व्हीव्हीपॅटवर असलेले मतदानाचा एकच आकडा आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com