Fishes Found in Saline Water Shock Scientists
esakal
विदर्भ
Lonar Lake : अहो आर्श्चयम! लोणार सरोवरात आढळले चक्क मासे, दुर्मिळ जैवविविधता धोक्यात...
Lonar Lake Mystery : लोणार सरोवर परिसरात मासे आढळल्याने जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच प्रशासनाचे 'सरोवर मासेविरहित आहे' हे विधान आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
लोणार, ता.२ : दुर्मिळ जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या जगविख्यात लोणार सरोवरातील खाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर मासे दिसू लागले आहेत. सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी महिनाभरापूर्वी 'सरोवरात मासे असूच शकत नाहीत' असे ठाम विधान केले होते. परिणामी प्रशासनाचे 'सरोवर मासेविरहित आहे' हे विधान आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मात्र, आता पारदर्शक झालेल्या पाण्यात माशांचे प्रत्यक्ष अस्तित्व स्पष्टपणे दिसत आहे.
